वजन कमी करायचं असेल तर पूर्ण आणि शांत झोप आवश्यक

वजन कमी करायचं असेल तर पूर्ण आणि शांत झोप आवश्यक

जास्त झोपल्यामुळे लठ्ठपणा वाढतो असा समज असल्यामुळे अनेकजण अपूरी झोप घेतात

  • Share this:

मुंबई, 7 मे : निरोगी शरीरासाठी चांगली झोप अत्यंत महत्वाची आहे. बरेचदा जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही, तेव्हा कशातच आपलं लक्ष लागत नाही आणि दिवसभर अस्वस्थता जाणवते. याचा परिणाम तुमच्या कामावरसुद्धा होतो. अनेकांना असं वाटतं की जास्त झोप घेतल्याने लठ्ठपणा वाढतो. पण हे साफ चुकीचं असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

सतत अपुऱ्या राहणाऱ्या झोपेमुळे त्याचे वाईट परिणाम मनावर आणि शरीरावर होतात. सतत थकल्यासारख वाटणं, अशक्तपणा, पाठदुखी अशा समस्या वाढतात. उच्च रक्तदाब आणि मनावरचा ताण वाढतो. चिंता वाढल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

यशाचं शिखर सर करायचं असेल तर आत्मविश्वास हवाच; त्यासाठी लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

जास्त झोपल्यामुळे लठ्ठपणा वाढतो असा समज असल्यामुळे अनेकजण अपूरी झोप घेतात. झोप कमी झाल्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होतं आणि त्याच प्रमाणात कॅलरीजसुद्धा कमी होतात आणि खाण्यावरचं नियंत्रण सुटतं. सतत गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे खूप जास्त डायटिंग करण्याएवजी जर तुम्ही पूर्ण झोप घेतली तर तुमचं वजन कमी होतं असं संशोधकांचं म्हणणं आहे.

तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

जर तुम्ही किमान 7 तास शांत झोप घेतली नाही तर ह्रदयविकाराची शक्यता बळावते. शरीरातलं मेटाबॉलिजम कमी होतं. जर तुम्ही पूर्ण झोप घेतली तर दिवसभर फ्रेश राहता. तसंच अनेक आजर तुमच्यापासून दूर राहतात.

First published: June 7, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading