मेंदू कार्यक्षम ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

मेंदू कार्यक्षम ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मानसिकदृष्ट्या मेंदूला सक्रिय ठेवलं जाऊ शकतं

  • Share this:

मुंबई, 10 जून - जी लोकं मानसिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात, त्यांचा मेंदू कार्यक्षण आणि आरोग्यसंपन्न असतो. पुस्तकं वाचण्यापासून ते काही ज्ञानवर्धक किंवा विचारांना चालना देणारी भाषणे ऐकणं, रेडिओ ऐकणं, खेळणं, मातृभाषेशिवाय अन्य एखादी भाषा शिकणं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे मानसिकदृष्ट्या मेंदूला सक्रिय केलं जाऊ शकतं. जाणून घ्या मेंदू कार्यक्षम करण्याच्या या टिप्स.

योगाभ्यास करा - धकाधकीच्या जीवनात मनावर प्रचंड ताण आणि दडपण आलेलं असतं. ते घालविण्यासाठी दररोज पहाटे उठून यागाभ्यास करावा. योगाभ्यास केल्याने मन शांत होतो. त्याचा फायदा मेदूच्या कार्यक्षमतेवर होतो.

संगीत ऐका - कोणतंही आवडतं वाद्य वाजविण्याने किंवा संगीत ऐकण्याने मेंदूला चालना मिळते. मन प्रसन्न आणि आनंदी झाल्याने स्मरणशक्तीवरसुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो.

माणसं ओळखायला नाही, तर समजायला शिका

मित्रांसोबत बोला - प्रत्यक्ष जीवनात नवे मीत्र बनवा. या माध्यमातून आपली सामाजिक कक्षा वाढविण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत सुख-दुःखाच्या गोष्टींवर बोलल्याने मन शांत होतं आणि तणाव दूर होतो.

व्यसन टाळा - मद्यप्राशनामुळे विचार करण्याची, निर्णय घेण्याची, बोलण्याची, चालण्या-फिरण्याची शक्ती क्षिण होते. स्मरणशक्तीवरसुद्धा त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे अल्कोहोलपासून दूर राहा.

वजन ठेवा नियंत्रित - संतुलित आणि स्वास्थ्यवर्धक आहार मेंदूला सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. ह्रदयाला स्वास्थ आणि वजनाला संतुलित ठेवणआरा आहार जर तुम्ही घेतला तर रक्तदाब नियंत्रित राहतो. त्याचा फायदा मेंदूला होतो.

स्विमिंग किंवा ब्रिक्स वॉक - स्विमिंग किंवा ब्रिक्स वॉक केल्याने ह्रदयाची गती वाढते. हे मेंदूसाठी लाभदायक आहे. शारीरिक हालचालींमुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढतो.

'या' 5 कारणांमुळे नको असलेलं नातं जपण्यासाठी झटत राहतात महिला

व्हीडिओ गेम्स - व्हीडिओ गेम्समुळे मेंदूचा वापर मर्यादित प्रमाणात केला तर मेंदूच्या क्रिया, स्मरणशक्ती नियंत्रित करणाऱ्या भागाला जागृती मिळते. त्यामुळे व्हीडिओ गेम्स खेळा पण मर्यादित प्रमाणातच.

मार्ग बदला - ज्या मार्गाने तुम्ही दररोज तुम्ही घरी जाता तो सोडून इतर दुसऱ्या कुठल्या मार्गाने जा. डोळे बंद करून खाण्याच्या पदार्थांना ओळखण्याचा प्रयत्न करा.

हे करून पाहा - तुम्ही नेहमी उजव्या हाताने लिहित असाल तर एखादवेळेस डाव्या हाताने लिहून पाहा. लहानपणी एखाद्या गाण्याचे शब्द किंवा ओळी उलट करून तुम्ही गात होता ते आठवा.

First published: June 10, 2019, 6:39 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading