मुंबई, 15 जून : कलिंगड म्हणजेच टरबूज या फळात 90 टक्के पाणी असतं, जे आपल्या शरीराला आरोग्यदायी ठरतं. यामुळे शरीराला इलेक्ट्रोलाइट्सचा पुरवठा होतो. कलिंगड खाल्ल्याने शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. तसंच यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचेची आद्रता टिकून राहते. आज आम्ही तुम्हाला कलिंगड खाण्याने आणखी कोणकोणते फायदे होतात हे सांगणार आहोत.
1 - कलिंगडमध्ये बीटा कैरोटिन नावाचा घटक भरपूर प्रमाणात असतो. ज्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते. लाइकोपीन आणि अ जीवनसत्त्व असल्यामुळे डोळ्यांशी संबंधित आजार दूर होतात. रातांधळेपणा, मोतीबिंदू यांसाठी कलिंगड उपयुक्त आहे. रेटीनामध्ये पिगमेंटच्या निर्मितीसाठी कलिंगड उपयुक्त ठरतं. तसंच अनेक प्रकाच्या संसर्गापासून बचाव होतो.
उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर
2 - कलिंगड यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. याशिवाय यकृत स्वच्छ होतं. रक्तातील युरिक अॅसिड कमी करण्यासाठी कलिंगड सेवन करावं. यामुळे यकृताला आलेली सूज कमी होते.
3 - एका संशोधनानुसार, कलिंगडाच्या सेवनाने शरीरातली उर्जा 20 टक्क्यांनी वाढते. यात पोटॅशियम, 'क' आणि 'ब' जीवनसत्त्व, बीटा कैरोटिन आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे उर्जा पातळी तर वाढतेच, शिवाय शरीराला स्फूर्ती देखील मिळते.
पित्त आणि कफनाशक आहे 'ही' भाजी; जाणून घ्या फायदे
4 - तीव्र उन्हामुळे आणि उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शरीर निर्जीव बनतं. अशावेळी शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढविण्यासाठी कलिंगडाचं सेवन फायदेशीर ठरतं.
5 - कलिंगड हे एक अँटिऑक्सिडेंटसुद्धा आहे. किडन्या सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतं. वजन कमी करण्यासाठीसुद्धा कलिंगड उपयुक्त आहे.