• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कान दुखत असेल तर करा 'हा' घरगुती उपाय

कान दुखत असेल तर करा 'हा' घरगुती उपाय

कान आणि घसा यांना जोडणाऱ्या शिरांमध्ये इन्फेक्शन झाल्याने कान दुखतो.

 • Share this:
  मुंबई, 25 मे : अनेक जणांना बाराही महिने सर्दीचा त्रास होतो. कान आणि घसा यांना जोडणाऱ्या शिरांमध्ये इन्फेक्शन झाल्याने कान दुखतो. अनेकदा कानदुखीचं नेमकं कारण समजू शकत नाही, अशा वेळेस डाक्टरांचा सल्ला घ्याव. पण कान दुखण्याची प्रमाण कमी असेल तर लसणाचं तेल हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो. रागाचा पारा नियंत्रणात ठेवयचा असले तर हे कराच तुम्ही मोहरीचं, तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल लुब्रिकंट म्हणून काम करतात. ते कानदुखी कमी करण्यासाठी मदत करतात. तर लसणामध्ये दाह कमी करण्याची क्षमता असल्यामुळे त्याचा फायदा कानदुखी थांबविण्यासाठी लाभदायक ठरतो. लसणाच्या तेलामुले अवघ्या 15 मिनिटांत कानातल्या वेदना कमी व्हायला सुरूवात होते. डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच असं बनवा लसणाचं तेल - लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून त्या एक चमचा तिळाचं किंवा मोहरीचं किंवा खोबऱ्याच्या तेलात गरम करा. लसणाच्या पाकळ्यांचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि नंतर ते थोडं कोंबट झाल्यानंतर ड्रॉपने किंवा कापसाच्या बोळ्याने 2-4 थेंब कानात टाका. मात्र कान जास्त दुखत असेल तर हा घरगुती उपाय करण्याएवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  
  First published: