तुमचं कशातच लक्ष लागत नसेल, तर मनःशांती मिळविण्यासाठी करा 'हे' उपाय

तुमचं कशातच लक्ष लागत नसेल, तर मनःशांती मिळविण्यासाठी करा 'हे' उपाय

अशा परिस्थितीला कंटाळून घेऊ नका टोकाची भूमिका

  • Share this:

मुंबई, 6 मे : बरेचदा आपलं कशातच लक्ष लागत नाही. मन अस्वस्थ असल्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणंसुद्धा कठीण होऊन जातं. अशा परिस्थितीला कंटाळून अनेकजण टोकाची भूमिकासुद्धा घेतात. जर अशा परिस्थितीवर मात करणं सहज शक्य नसलं तरी अशक्यही मुळीच नसतं. जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या पायाशी लोळण घेत असल्या, पण मन जर शांत नसेल तर तुम्हाला सुखी जीवन जगता येणार नाही. आज आम्ही तुम्हाला मनःशांती मिळविण्यासाठीचे काही उपाय सांगणार आहोत.

सगळ्यात पहिले तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, मन हे एखीद्या अनियंत्रित घोड्यासाखा असतं. त्यावर कुणीच पूर्णतः ताबा मिळूव शकत नाही. त्यामुळे केव्हा, कुठे आणि कशापद्धतीने तुमच्या मनावर नियंत्रण मिळवायचं हे तुम्हालाच ठरवावं लागेल.

कामाच्या अतिताणानं Burn Out झालात? ही थकावट नव्हे तर आजारच - WHO ने घेतली दखल

सगळ्यात पहिले तर डोक्यातले सगळे विचार दूर सारून तुम्हाला चिंतामुक्त व्हावं लागेल. कोणत्याही कामाला सुरुवात करण्याआधी त्याबाबत आझीत आपलं मत बनवू नका. तसं जर तुम्ही केलं तर, तुम्ही आत्मकेंद्रीत व्हाल आणि एका चौकटीत स्वतःला बंद करून घ्याल. लक्षात ठेवा की जीनव अनंत आणि अमर्याद आहे. त्यामुळे तुमच्या क्षमतासुद्धा अनंत आहेत. मनावर ताबा मिळवून तुम्ही काहीही प्राप्त करू शकता.

तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

Loading...

जेव्हा तुम्हाला वाटतं की, ध्येयावर किंवा जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास आपण असमर्थ ठरत आहोत, तेव्हा जरा वेळ एकटं बसा आणि मन शांत करण्याचा प्रयत्न करा. जर कोणत्याही कारणामुळे तुमच्या मनात वादळ उठलं असेल, तर ते आधी तुम्हाला शांत करावं लागेल. मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रगती करू शकता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 6, 2019 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...