तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

दुधातली भेसळ ही डोळ्याने, वासाने किंवा चवीने ओळखता येणं अशक्य आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 03:20 PM IST

तुम्ही भेसळयुक्त दूध तर पीत नाही ना? अशी करा घरबसल्या तपासणी

मुंबई, 7 मे : दूध हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं आपण लहानपणापासून एकलं आहे. बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी दुधापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही. यामुळेच कदाचित दूध पाहून नाक मुरडणाऱ्या मुलांच्या आया त्यांना जबरदस्ती दूध प्यायला लावतात. दुधात असे काही गुणतत्व आहेत जे शरीराच्या सर्वांगिण विकासासाठी फायदेशीर ठरतात. दूध पिण्याची सवय तर चांगलीच आहे. मात्र, भेसळयुक्त दुधामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. दुधातली भेसळ ही डोळ्याने, वासाने किंवा चवीने ओळखता येणं अशक्य आहे. त्यासाठी काही रासायनिक चाचण्या प्रयोगशाळेत कराव्या लागतात, ज्या खर्चिक असतात. पण आज आम्ही तुम्हाला दुधातली भेसळ घरबसल्या कशी ओळखायची हे सांगणार आहोत.


आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी


स्टार्चची भेसळ - अनेकदा नफा कमविण्यासाठी दुधात स्टार्च मिसळला जातो. ही भेसळ ओळखण्यासाठी 5 मिलीलीटर दुधात आयोडिनचे 2-3 थेंब टाकावेत. जर दुधाचा रंग फिक्कट निळा झाला तर समजावं की त्यात स्टार्च मिसळलेला आहे.

Loading...

डिटर्जेंटची भेसळ - दुधात डिटर्जेंटची भेसळ आहे हे ओळखायचं असेल तर 10 मिलीलीटर दुधात तितकंच पाणी मिसळा. जर त्यात फेस तयार झाला तर समजावं की दुधात डिटर्जेंटची भेसळ आहे.

कृत्रीम दूध - कृत्रीम दूध चव ही कडू असते. तुम्ही जर त्या दुधात दोन बोटं बुडवली आणि ती एकमेकांवर चोळली तर साबणाप्रमाणे तुम्हाला स्पर्श जाणवतो. तर उकळल्यानंतर या दूधाचा रंग पिवळा पडतो.

उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर

यूरियाची भेसळ - अनेक दूध विक्रेते नफा कमविण्यासाठी दुधात यूरीया मिसळतात. अशी भेसळ ओळखायची असेल तर 10 मिलीलीटर दुधात पोटेशियम कार्बेनाइटचे 5-6 थेंब टाकावे. जर दुधाचा रंग पिवळा पडला तर समजावे की त्यात यूरियाची भेसळ केली आहे.

ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नफा कमविण्याच्या उद्देशाने अनेक विक्रेते दुधात कास्टिक सोड, ग्लुकोज, पांढरा पेंट आणि रिफाइन तेल सुद्धा मिसळतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: milk
First Published: Jun 7, 2019 03:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...