Elec-widget

डोळ्यांचं काजळ न पसरण्यासाठी काही खास टिप्स

डोळ्यांचं काजळ न पसरण्यासाठी काही खास टिप्स

आपल्या डोळ्यांचा मेकअप म्हणजे खूपच नाजूक. डोळ्यांचा मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यानेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य खुलून येतं आणि त्यात जर आपलं काजळ डोळ्याभोवती पसरलं तर मात्र आपला चेहरा खराब दिसतो.

  • Share this:

6 डिसेंबर : आता कुठे बाहेर जायचं म्हणजे चेहऱ्याचा मेकअप खूपच महत्त्वाचा. त्यातल्या त्यात आपल्या डोळ्यांचा मेकअप म्हणजे खूपच नाजूक. डोळ्यांचा मेकअप करताना खूप काळजी घ्यावी लागते कारण त्यानेच चेहऱ्याचं खरं सौंदर्य खुलून येतं आणि त्यात जर आपलं काजळ डोळ्याभोवती पसरलं तर मात्र आपला चेहरा खराब दिसतो.

त्यामुळे डोळ्यांना काजळ लावताना खालील काही खास टिप्स तुमचं काजळ दिवसभर टिकून ठेवायला मदत करतील.

- मेकअपची सुरुवात करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल आणि मेकअप न पसरण्यास मदत होईल.

- हे झाल्यावर चेहरा स्वच्छ टोनरने धुऊन घ्या. याने चेहरा तजेलदार होईल. यानंतर चेहऱ्यावर मेकअप करायला सुरुवात करा.

- चेहऱ्यावर फाऊंडेशनचा बेस लावल्यानंतर डोळ्यांच्या खाली बेबी पावडर लावा आणि नंतर चांगल्या क्वालिटीचं वॉटरप्रूफ काजळ काळजीपूर्वक डोळ्यांना लावा.  असं केल्याने डोळ्यांचं काजळ टिकून राहतं.

Loading...

- प्रत्येकाच्या डोळ्यांचा आकार लहान-मोठा असतो. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या आकारानुसार काजळ लावा.

- आधी आयलायनर लावून मग त्यावर काजळ लावलं तरी चालेल. याने काजळ पूर्ण दिवस टिकून राहते आणि डोळ्याभोवती पसरत नाही.

- अनेकांच्या पापण्यांजवळ तेलकटपणा असतो, त्याने काजळ लवकर पसरते, अशा वेळी कापसाच्या बोळ्याने ते तेल पुसून घ्या.

- सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना मेकअप काढून झोपा. याने उद्याचा मेकअप करण्यासाठी डोळे स्वच्छ राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 06:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...