मुंबई, 14 मार्च : गंध दोन प्रकारचे असतात. चांगला आणि वाईट. प्रत्येक गोष्टीला एक ठराविक गंध असतो. जसा आपल्या शरीराला असतो. घामामुळे अनेकांच्या शरीराला चांगला गंध येत नाही. पण काही जणांच्या घामाला काहीच वास नसतो.
आपल्या शरीराला येणारा गंध अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. अनुवंशिकता, आरोग्य, स्वच्छता इत्यादी. आपल्या शरीराचा गंध बॅक्टेरियावर अवलंबून असतो.
आपल्याला येणारा घाम हा प्रोटिन आणि साखरेपासून बनलेला असतो. याशिवाय आपण काय खातो,त्याप्रमाणे आपल्या शरीराचा गंध येत असतो.
अनेक जण शारीरिक स्वच्छता अगदी चोख ठेवतात. तरीही त्यांच्या अंगातून दुर्गंध येत असतो. याचं कारण ते खात असलेले पदार्थ. काही खाद्य पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ले तर शरीरातून दुर्गंध बाहेर पडतो.
तुम्ही जास्त कांदे, लसूण खाल्लेत तर शरीरातून वाईट गंध येतो. कारण त्यात सल्फर आणि एलिसिन असतं. त्याचा वास बराच काळ शरीरात टिकतो. याशिवाय कोबी आणि फ्लाॅवर जास्त खाल्ला तरी शरीरातून दुर्गंध येतो.
कांदा-लसणाशिवाय काही फळं आणि भाज्यांमध्ये पोटेंट कॅरेटेनाॅइड्स असतं. त्याचा परिणाम तुमच्या शरीरातून येणाऱ्या गंधावर होतो.
त्यामुळे कुठलंही जेवणं जेवताना किंवा आहार घेताना खूप काळजी घ्या. कारण शरीरातून येणाऱ्या गंधाचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत असतो. त्यानं तुमचं इम्प्रेशन पडतं. त्यामुळे काळजी घ्यायला हवी.
हल्ली बाजारात अनेक प्रकारचे डिओ आणि सेंट्स उपलब्ध असतात. ते तुमच्या शरीराचा दुर्गंध दूर करतात. पण बऱ्याचदा डिओ वापरूनही शरीराचा उग्र वास जात नाही. तेव्हा आपण काय खातो याचा विचार करावा.