मुंबई, 05 ऑक्टोबर : आरोग्याविषयीची (Health) चर्चा होते, तेव्हा कोलेस्ट्रॉलचा (Cholesterol) संदर्भ येतोच. कोलेस्ट्रॉल वाढल्यानं काही अन्नपदार्थ वर्ज्य करा, जादा फॅट्स (Fats)असलेले अन्नपदार्थ खाऊ नका, असं सांगितलं जातं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, हे जरी खरं असलं तरी कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी महत्त्वपूर्ण आहे.
कोलेस्ट्रॉल म्हणजे पेशींबाहेरील एका विशेष घटकापासून बनलेला थर असतो. वैद्यकशास्त्रात याला लिपीड (Lipid) असं म्हणतात. कोलेस्ट्रॉलचे सामान्यतः दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) जे शरीरासाठी अपायकारक असतं आणि दुसरं म्हणजे गुड किंवा चांगलं कोलेस्ट्रॉल (Good Cholesterol) जे शरीरासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेट्सप्रमाणे आवश्यक असतं.
लो डेन्सिटी लायपोप्रोटीनला बॅड कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. जेव्हा लायपोप्रोटीनमध्ये प्रोटीनऐवजी फॅट्सचं प्रमाण वाढतं, तेव्हा बॅड कोलेस्टेरॉल जमा होऊ लागतं. या स्थितीत हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो.
मानवी शरीरात होणाऱ्या शारीरिक क्रिया सुरळीतपणे पूर्ण व्हाव्यात यासाठी कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्ट्रॉल करतं. मात्र कोलेस्ट्रॉलच्या अनुषंगाने अनेकांच्या मनात अनेक संभ्रम आणि गैरसमज आहेत. मेडिकल न्यूज टुडेने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
कोलेस्ट्रॉलविषयी असलेले गैरसमज
सर्व कोलेस्ट्रॉल वाईट असतात : कोलेस्टेरॉल हा पेशीद्रव्याचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. स्टेरॉइड हार्मोन्सची (Steroid Hormones) निर्मिती कोलेस्ट्रॉल करतं. त्यामुळे सर्व कोलेस्ट्रॉल वाईट आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे.
हे वाचा - लेकीच्या Period leave साठी बाबाची धडपड; शाळेतील सुट्टीसाठी लढतोय लढा
डॉ. ग्रीनफिल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलेस्ट्रॉल वाईट नसतात. ते अगदी निर्दोष असतात; मात्र आधुनिक जीवनशैलीत कोलेस्ट्रॉलबाबत चुकीचं भाष्य केलं जातं. कोलेस्ट्रॉलमुळे व्हिटॅमिन डीची निर्मिती होते. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉलल शरीरासाठी हानिकारक नसतं. हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमधल्या अन्य कोलेस्ट्रॉलच्या हानिकारक स्वरूपांना नष्ट करतं; मात्र वाईट म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर ती शरीरासाठी अपायकारक ठरते.
तुम्ही निरोगी असाल तर कोलेस्ट्रॉल योग्य राहील : मी निरोगी असल्यानं माझ्या शरीरातली कोलेस्ट्रॉल पातळी वाढलेली नाही, असा समज काही जणांमध्ये असतो; मात्र तो पूर्णतः चुकीचा आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होणं किंवा वाढणं या दोन्ही बाबी चांगल्या नाहीत. कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहणं आवश्यक असल्याचं डॉ. ग्रीनफिल्ड यांनी सांगितलं.
हे वाचा - थंड पाण्यानं अंघोळ करता? मग जाणून घ्या फायदे आणि तोटे दोन्ही
काहीच लक्षणं दिसत नाहीत : माझी कोलेस्ट्रॉल पातळी वाढली असती तर तशी लक्षणं दिसली असती, असं असं अनेक जण म्हणतात; मात्र कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर त्याची बाह्यस्वरूपात लक्षणं दिसत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.