S M L

तुम्हाला वजन कमी करायचंय? मग आहारात हे हवंच!

Sonali Deshpande | Updated On: Jul 24, 2018 06:04 PM IST

तुम्हाला वजन कमी करायचंय? मग आहारात हे हवंच!

मुंबई, 24 जुलै : तुम्हाला वजन कमी करायचंय? मग तूप खा. आश्चर्य वाटलं ना? पण एका संशोधनानुसार घरच्या घरीच गाईच्या शुद्ध दुधापासून बनवलेलं तूप आपलं आरोग्य सुधारते आणि त्यापासून आपल्या शरीरातील चरबी  वाढत नाही.तुपात इसेंसिअल अॅमिनो अॅसिडस् असतात ते शरीरातील चरबीचे घटक कमी करण्यास मदत करते अश्यातच तुम्ही जर वजन कमी करायच्या विचारात असाल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये तुपाचा समावेश करावाच लागेल.

तुपात  अॅमिनो अॅसिड आहे.  त्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते. याच अॅमिनो अॅसिडमुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते आणि शरीराला सूज असेल तर त्यावरही उपाय म्हणून तुपाचं सेवन केल्याने सूज लवकर कमी होते.

वजन कमी करण्याच्या व्यतिरिक्त तुपामधील व्हिटॅमिन्समुळे इम्युनिटी सिस्टिम सुधारते आणि  रोगप्रतिकार शक्ती सुधारते, आपण आजारांपासून दूर राहू शकतो

वाढत्या वयात तुपाच्या सेवनाने संधीवातासारखे आजार  कमी होतात, यात काही प्रमाणात फॅट्स असतात त्याचा उपयोग शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी होतो .

त्यामुळे तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर जेवणात तूप हवंच. आपल्याकडे मराठमोळ्या जेवणात वरणभात आणि त्यावर साजुक तूप असतं. ते आदर्श ताट मानलं जातं. तुपामुळे स्मरणशक्तीही चांगली होते.

Loading...
Loading...

अनेकदा निरोगी राहण्यासाठी घरात विशेषत: जेवणात बरेच पदार्थ असतात. पण अज्ञानामुळे किंवा गैरसमजुतीमुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.  शिवाय फास्ट फूडच्या नादात तर आरोग्याची हेळसांड होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 06:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close