S M L

वजन कमी करण्यासाठी खा तूप; आरोग्य होईल सुदृढ

रोजच्या आहारात तुम्ही एक चमचा तूप खाल्ल्यानं तुम्हाला हे फायदे होऊ शकतात

Updated On: May 10, 2019 07:07 AM IST

वजन कमी करण्यासाठी खा तूप; आरोग्य होईल सुदृढ

मुंबई, 10 मे : वजन वाढेल या भीतीने अनेकजण तूप आणि तुपाचे अनेक पदार्थ खाणं टाळतात. मात्र, हा एक गैरसमज आहे. आरोग्याच्या दृष्टीने गायीचं तूप अत्यंत गुणकारी आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि फास्ट फूड खाण्याने नक्कीच वजन वाढतं, पण वजन कमी करण्यासाठी गायीचं तूप अत्यंत गुणकारी आहे. तुपामुळे एनर्जी वाढते, मानसिक स्वास्थही चांगलं राहतं. गायीच्या तुपात कॉन्जुगेटेड लिनोलिक अॅसिडचा (Conjugated Linoleic acid) असतं. जे शरिराचं वजन कमी करण्यासाठी लाभदायक ठरतं. देशी तुपामुळे साचून राहिलेली चरबी कमी होते आणि मेटाबॉलिझम वाढतं. त्यामुळे योग्य प्रमाणात तूप सेवन केल्यास वजन वाढण्याऐवजी नक्कीच कमी होतं.

तुपात कॅलोरी सोबत शॉर्ट चेन फॅटी अॅसिड असतात यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारते आणि अन्न लवकर पचण्यास मदत होते. तुपातील अॅमिनो अॅसिड फॅटवर नियंत्रण ठेवतात त्यामुळे शरीरात फॅट सेल्स तयार होत नाहीत.


तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे वात आणि पित्त याचा त्रास होत नाही आणि पचनक्रिया चांगली राहते. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असतील तर देशी तूप लुब्रिकेंटचं काम करतं. तसंच तुपामुळे त्वचासुद्धा सॉफ्ट राहते.


‘लग्न करायचं असल्यास हिंदू धर्म स्वीकार, मांसाहार सोडून दे’

Loading...


पण तुम्हाला माहीत आहे का? गायीचं तूप आणि म्हशीचं तूप असे दोन प्रकार आहेत. त्याशिवाय तूप खाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तूम्ही तूप कसं खाता यावर खूप गोष्टी अवलंबून असतात.

गायीच्या तूपाचा औषध म्हणून वापर केला जातो. छातीत कफ घट्टा झाला किंवा सर्दी खोकला झाल्यास गायीचं तूप छातीवर लावलं जातं त्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते. शिवाय तूप खाल्ल्यानं पोटात थंडावा मिळतो. रोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्यानं तुमचं पोट साफ होण्यास मदत होते. शरीरातील उष्णता कमी होते. लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप अत्यंत गुणकारी आहे.

गावठी तूप खाल्ल्यानं तोंडात येणारे फोड तोंडात होणारी जळजळ कमी होते. त्वचा कोरडी पडली असेल तर किंवा थंडीत फुटते तेव्हा घरगुती तूप लावल्यानं मुलायम होते. रोजच्या आहारात तुपाचं सेवन केल्यानं तुमचं आरोग्य निश्चित निरोगी राहिल.

SPECIAL REPORT: आशियातल्या सर्वात लठ्ठ महिलेनं 4 वर्षात घटवलं 214 किलो वजन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2019 07:07 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close