चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी दररोज करा 'हे' 5 व्यायाम

त्वचा तुकतुकीत ठेवायची असेल तर दररोज व्यायाम करायला हवा

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 11:12 PM IST

चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी दररोज करा 'हे' 5 व्यायाम

मुंबई, 14 जून : त्वचेचं आरोग्य उत्तम रहावं म्हणून आपण आहाराला आणि स्वच्छतेला महत्त्व देतो. यासोबतच त्वचा तुकतुकीत ठेवायची असेल तर दररोज व्यायाम करायला हवा. चेहरा तजेलदार ठेवण्यासाठी आणि त्याची चमक राखण्यासाठी दररोज फक्त दहा मिनिटे हे पाच व्यायाम तुम्ही करायला हवेत.

1 - ताठ बसा. डोळे शक्य तितके मोठे करा. आधी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आणि नंतर विरुद्ध दिशेने फिरवा. त्यानंतर डोळे बंद करून मनातल्या मनात दहापर्यंत पर्यंत आकडे मोजा. हीच क्रिया दहा वेळा करावी.

मुरुम घालविण्यासाठी परिणामकारक आहेत 'ही' योगासनं

2 - एक दीर्घ श्वास घ्या आणि हवा भरून एक गाल फुगवा. त्यानंतर मनातल्या मनात दहापर्यंत पर्यंत आकडे मोजा. आता दुसऱ्या गालात हवा भरा आणि तीच कृती परत करा. त्यानंतर गाल आत ओढून घ्या. अगदी दातावर गालाचा दाब पडेपर्यंत गाला आत ओढा.

3 - ताठ बसलेल्या स्थितीत दोन्ही ओठ उघडून खळखळून हसा. हसताना गालाच्या पेशींवर प्रभाव पडायला हवा. पुन्हा ओठ बंद ठेवून स्मितहास्य करा, ही क्रिया दररोज दहा वेळा करावी.

Loading...

कंबरेचा घेर कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहे 'हे' आसन

4 - बसलेल्या स्थितीत चेहरा मागे झुकवा आणि छताकडे पाहा. ओठ बंद करा च्युइंगम चघळल्याप्रमाणे हालचाली करा, यामुळे गळ्याच्या पेशींना व्यायाम होतो.

5 - बसलेल्या स्थितीत समोर पाहात डोळे उघडून जोरात 'ओ' म्हणून ओरडा. त्यानंतर 'ई' म्हणून ओरडा. हे दोन्ही प्रकार केल्याने चेहऱ्याच्या पेशींना व्यायाम मिळतो.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 11:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...