तुम्ही TV समोर बसून जेवता का? लगेच मोडा ही सवय, कारण...

'या' सवयीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर जडतील गंभीर आजार.

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 05:01 PM IST

तुम्ही TV समोर बसून जेवता का? लगेच मोडा ही सवय, कारण...

मुंबई, 8 मे : अनेक जण ऑफिसमधून घरी आल्यानंतर टीव्हीसमोर बसून काही ना काही खात बसतात. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याची त्यांना अजिबात जाणीव नसते. जर तुम्हीसुद्धा याच सवयीचे गुलाम असाल तर ताबडतोब ही सवय मोडण्याची गरज आहे. मोठ्यांचं अनुकरण करणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. अनेक गंभीर आजार त्यांना जडताहेत.

यासंदर्भात करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, जी लोकं टीवी पाहताना काही ना काही खात राहतात त्यांच्या शरीरातली पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे त्यांना चयापचयाची समस्या (मेटाबॉलिक सिंड्रोम) सुरू होते. जवळपास 33,900 तरुण मुला-मुलींवर हे संशोधन करण्यात आलं. ज्यात रक्तदाब वाढणं, हाय ब्लड शुगर, कमरेची चरबी वाढणं आणि हाय कोलेस्ट्रॉल या समस्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

टीव्हीसमोर बसून खाताना टीव्हीवर काय सुरू आहे याकडेच अनेकांच लक्ष असतं, त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त अन्न त्यांच्या पोटात जातं आणि त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतात. टीव्ही समोर बसून खात राहण्याच्या सवयीमुळेच गंभीर आजर जडतात असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.

मेटाबॉलिक सिंड्रोम हे कुठल्या आजाराचं नाव नही. पण जेव्हा एकाच वेळेस अनेक गंभीर आजार होतात तेव्हा ही समस्या निर्माण होते, असं संशोधक सांगतात. हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि जास्त वजन यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम ची समस्या निर्माण होतो. खाण्या-पिण्याच्या या सवयीकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही देखील याचे शिकार होऊ शकता असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 8, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...