नियमित सेवन करा मोड आलेलं कडधान्य; 'हे' आहेत फायदे

नियमित सेवन करा मोड आलेलं कडधान्य; 'हे' आहेत फायदे

...म्हणून मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हणतात

  • Share this:

मुंबई, 20 जून : मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्‍त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असालयाच हवीत. मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात.

उन्हाळ्यात सगळ्यात गुणकारी ठरणारा 'हा' पदार्थ पोटाच्या समस्याही करतो दूर

1 - मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात.

2 - मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असतं.

3 - मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.

4 - मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.

5 - मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं.

गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरच्या घरी बनवा 'हा' पदार्थ

6 - मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढतं.

7 - मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.

8 - मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं.

First published: June 20, 2019, 10:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading