दररोज खा एक लवंग; होतील 'हे' फायदे

दररोज खा एक लवंग; होतील 'हे' फायदे

लवंगीला आयुर्वेदात सगळ्या मसाल्यांचा गुरू असं मानलं जातं.

  • Share this:

मुंबई, 26 मे : वास्तविक पाहता लवंग हा एक मसाल्याचा प्रकार. पण लवंगीला आयुर्वेदात सगळ्या मसाल्यांचा गुरू असं मानलं जातं. छो्ट्याशा लवंगचे  अनेक फायदे आहे जे तुम्ही एकलेही नसतील. आज आम्ही तुम्हाला बऱ्याच रोगांना दूर ठेवण्याची क्षमता असलेल्या लवंगीचे फायदे सांगणा आहोत.

1 - कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी दररोज एक लवंग खायला हवी. ह्रदय रोग्यांसाठी लवंग गुणकारी आहे.

2 - सर्दीमुळे नाक बंद झाल्यास, लवंगीच्या तेलाचा एक थेंब रुमालावर टाकून त्याचा वास घेतल्याने लगेच नाक मोकळं होतं.

तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

3 - लवंग ही मधुमेहींसाठी गुणकारी आहे. लवंग खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

Loading...

4 - लवंगीत अँटीबॅक्टेरियल गुणतत्त्व असल्यामुळे जखमा लवकर भरून निघतात.

5 - रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची ताकद एवढ्या छोट्याशा लवंगमध्ये आहे. त्यासाठी दररोज सकाळ-सायंकाळ जवण झाल्यानंतर एक लवंग खायला हवी.

कॉफीच्या अतिसेवनामुळे वाढतो 'या' रोगाचा धोका; रिसर्चमध्ये आलं समोर

6 - दिवसातून दोनदा लवंग टाकलेला चहा घेतल्याने चेहऱ्यावरचा ग्लो वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात.

7 - अॅसिडिटीचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनी 2-3 लवंग बारिक करून त्यात कपभर पाण्यात टाकाव्या. हे मिश्रण प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास लगेच कमी होतो.

8 - अनेकांना गुडघेदुखीचा त्रास होतो, जॉइन्ट्स दुखतात. अशा ठिकाणी लवंग तेल लावलं तर आराम मिळतो.


कान दुखत असेल तर करा 'हा' घरगुती उपाय

9 - ज्यांना खूप जास्त घाम येतो आणि तहान लागते अशा लोकांनी गरम पाण्यात लवंग बारिक करून ते प्यावं. यामुळे ही समस्या दूर होते.

10 - लवंगमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ती डोळ्यांसाठी लाभदायक ठरते. क्षिण झालेली डोळ्यांची शक्ती वाढवते.

11 - तोंडातली दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंग उत्तम आहे. एक लवंग तोंडात ठेवून जास्त वेळ चघळल्याने श्वास मोकळा होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर पळते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 26, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...