तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

पुरेशी झोप न झाल्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढली असून, त्याचा थेट परिणाम कामावर होत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : बदललेल्या जीवशैलीमुळे सतत कामाचा ताण आणि अपुरी झोप ही आता अनेकांसाठी रोजची बाब झाली आहे. पुरेशी झोप न झाल्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढली असून, त्याचा थेट परिणाम कामावर होत आहे.

अपुऱ्या झोपेचे परिणाम -

सतत अपुऱ्या राहणाऱ्या झोपेमुळे त्याचे वाईट परिणाम मनावर आणि शरीरावर होत आहेत. सतत थकल्यासारख वाटणं, अशक्तपणा, पाठदुखी अशा समस्या वाढल्या आहेत.

नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमता

उच्च रक्तदाब आणि मनावरचा ताण, चिंता वाढल्या असून, अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत.

झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभार आळस, काम करताना चिडचिड, नैराश्य तसंच कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. तसंच रक्तदाब अनियंत्रित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विस्मरण, रक्तातली साखर वाढणं, चेहऱ्यावर सतत थकवा, लठ्ठपणा, पोटाचे विकार, डोकेदुखी, अंगदुखी अशा विविध समस्या उद्भवत आहेत. झोप पूर्ण न झाल्यामुळे असे अनेक परिणाम शरीरावर होतात.

कॉफीच्या अतिसेवनामुळे वाढतो 'या' रोगाचा धोका; रिसर्चमध्ये आलं समोर

रात्री 10 ते पहाटे 6 ही वेळ नियमित झोपेची असायला हवी. मात्र, झोपेचं वेळापत्रक बिघडल्यामुळे बहुतांश लोकांची 7 तासांपेक्षाही कमी झोप होते. त्यात अनेकांना रात्री 1-2 वेळा जाग येत असल्यामुळे त्यांच्या झोपेचं खोबरं होतं.

First published: May 25, 2019, 11:12 PM IST

ताज्या बातम्या