भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य

भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य

वजन वाढेल या भीतीने अनेकजण भात खात नाही आणि मग इतर पदार्थांवर जास्त ताव मारला जातो

  • Share this:

मुंबई: भात खाल्ल्याने वजन वाढतं असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेकजण एकतर भात कमी खातात किंवा अजिबातच खात नाहीत. त्य़ामुळे होतं असं की, पोळी आणि इतर पदार्थांचं अधिक सेवन केलं जातं. मग मुळ मुद्दा बाजूला राहतो आणि इतर गोष्टींच्या अधिक सेवनाने वजन वाढायला लागतं. तर आज आम्ही तुम्हाला खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का हे सांगणार आहोत.

वास्तविक पाहात भात खाल्ल्याने वजन वाढतं यास कोणताही शास्त्रीय आधार नाही. अनेकदा भात बनवताना किंवा फ्राय करताना जास्त तेल किंवा तुप टाकलं जातं. यामुळे त्यातल्या कॅलरीजचं प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. तांदळातील पोषक तत्वे शरीराला मिळावित यासाठी भात योग्य प्रकारे तयार करणं आवश्यक आहे. तो बनवतानाच योग्य काळजी घेतली तर भातामुले वजन वाढणार नाही उलट कमी व्हायला मदत होईल.

नियमित सेवन करा मोड आलेलं कडधान्य; 'हे' आहेत फायदे

भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असल्यामुळे बराचवेळपर्यंत तुमचं पोट भरलेलं राहतं, भूक लागत नाही. त्यामुळे भात तयार करताना आवडत्या भाज्यांसोबत तो बनवावा. पांढऱ्या तांदळापेक्षा लालसर रंगाच्या तांदळात जास्त फायबर्स आणि कॅलरीज कमी असतात. भात तयार करताना त्यात इतर डाळी टाकून खिचडी बनवावी. यामुळे आहारात कमी प्रमाणात कॅलरीज घेतल्या जातात.

प्रक्रिया केलेले पदार्थ खाताय? मग आहे खूपच धोकादायक कारण...

तूरीची डाळ किंवा राजम्यासोबत तांदूळ शिजवावा. या पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात प्रथिनं असल्यामळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. जेवताना एक वाटीपेक्षा जास्त भात खाऊ नये. भातातलं पाणी काढून टाकल्याने त्यातील न्यूट्रियंट्स निघून जातात. असा भात खाल्ल्यानेही वजन नियंत्रणात राहतं.

Published by: ram deshpande
First published: June 21, 2019, 4:03 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading