तुम्हाला नखं कुरतडण्याची सवय आहे का? 'हे' आहेत दुष्परिणाम

तुम्हाला नखं कुरतडण्याची सवय आहे का? 'हे' आहेत दुष्परिणाम

नखं खाण्याची सवय मोडणं जरा कठीणच, पण अशक्य मुळीच नाही

  • Share this:

मुंबई, 15 जून - अनेकांना दातांनी नखं कुरतडण्याची सवय असते. लहानांप्रमाणेच मोठ्यांमध्येही ही वाईट सवय दिसून येते. या सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. जर तुम्हीसुद्धा या सवयीचे गुलाम झाला असाल तर त्याचे दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागतील.

1 - अस्वच्छतेमुळे ई कोलाई आणि साल्मोनेलासारखे बॅक्टेरिया त्वचा आणि नखांच्या मधल्या भागात जमा होतात. दाताने नखं कुरतडताना ते शरीरात गेल्यास संसर्ग होतो.

2 - नखं कुरतडल्याने पॅरोनिशिया नावाचा त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये नखाच्या आजूबाजूच्या त्वचेत बॅक्टेरिया संसर्ग होतो. ज्यामुळे बोटांना सूज येते आणि ते लाल होतात.

तुम्हाला शांत झोप लागत नाही? तर मग हे नक्की वाचा

3 - नखं खाण्याने शरीरात ह्युमन पेपिलोमा नामक व्हायरस पसरतो. ज्यामुळे हात, ओठ आणि तोंडात मस होऊ शकतात.

4 - नखं कुरतडताना त्यामध्ये जमा झालेली घाण दातांवर जमा होते. यामुळे दात ठिसूळ होतात आणि त्यांचा नैगर्गिक आकार बिघडतो.

5 - नखं कुरतडल्याने नखांमधले बॅक्टेरिया पोटात जातात आणि त्यामुळे पोटात संसर्गाचा धोका वाढतो.

6 - नखांखाली मॅटिड्ढ नावाचा थर डॅमेज होतो. ज्यामुळे नाखांचा आकार बिघडतो.

मेंदू कार्यक्षम ठेवायचा असेल तर लक्षात ठेवा या गोष्टी

एका अभ्यासातून हे समोर आलं आहे की, जे लोक सतत नखं खातात किंवा कुरतडतात ते अधिक तणावात असतात. या सवयीमुळे नखातले बॅक्टेरिया आतड्यांमध्ये जातात आणि यामुळे कॅन्सरसारखा रोगही होऊ शकतो. ही सवय मोडायची असेल तर जेव्हा केव्हा तुम्हाला नखं कुरतडण्याची इच्छा होईल तेव्हा लगेच दुसरीकडे लक्ष केंद्रीत करा. वाटलं तर लगेच एखादं फळ खाण्यासाठी घ्या. याने तुमचं मन डायव्हर्ट होतं. ही सवय मोडण्यासाठी तुम्ही च्युईंगमसुद्धा खाऊ शकता. नखं ट्रिम केल्यानेही ही सवय कमी होते. त्यामुळे नखं वाढलेले असतील तर लगेच ते कापा. वास्तविक पाहात ही सवय मोडणं जरा कठीण असतं, पण अशक्य मुळीच नाही.

First published: June 15, 2019, 9:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading