Home /News /lifestyle /

तुमचीही तिशी उलटून गेलीय का? तर मग नक्की खा 'हे' पौष्टिक पदार्थ, शरिराला होईल फायदा

तुमचीही तिशी उलटून गेलीय का? तर मग नक्की खा 'हे' पौष्टिक पदार्थ, शरिराला होईल फायदा

सर्व वयाच्या महिलांच्या रोजच्या जेवणात कोणते पदार्थ अवश्य समाविष्ट केले पाहिजेत याबद्दल फोर्टिस हॉस्पिटलच्या (कल्याण) (Fortis Hospital) क्लिनिकल डाएटिशियन श्वेता महाडिक यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे. महिलांनी जर हे पौष्टिक पदार्थ रोज खाल्ले तर त्यांचा आहार नक्कीच संतुलित होईल. परिणाम आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल.

पुढे वाचा ...
मुंबई, 05 जुलै: वयाच्या तिशीनंतर स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे असं नेहमी सांगितलं जातं. विशेषत: आपल्या खाण्यापिण्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आहारामुळेच संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. 30 ते 40-45 वर्षांपर्यंत आहार योग्य, चौरस (Healthy Diet) नसेल तर आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात. सर्व वयाच्या महिलांच्या रोजच्या जेवणात कोणते पदार्थ अवश्य समाविष्ट केले पाहिजेत याबद्दल फोर्टिस हॉस्पिटलच्या (कल्याण) (Fortis Hospital) क्लिनिकल डाएटिशियन श्वेता महाडिक यांनी महत्त्वाचं मार्गदर्शन केलं आहे. महिलांनी जर हे पौष्टिक पदार्थ रोज खाल्ले तर त्यांचा आहार नक्कीच संतुलित होईल. परिणाम आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. मोड आलेल्या कडधान्यांचे चाट (Sprout Chat) मोड आलेल्या कडधान्यांमध्ये प्रोटीन (Protein) आणि ई-व्हिटॅमिन (Vitamin E), व्हिटॅमिन के (Vitamin K), आयर्न (Iron), फायटोकेमिकल्स (Phytochemicals) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर असतात. या व्हिटॅमिन्समुळे आपली प्रतिकार शक्ती वाढायला तसंच रक्तप्रवाह वाढायलाही (Improves Blood Circulation) मदत होते. तसंच मोड आलेल्या कडधान्यांमध्ये झिंक (Zink), फॉलिक ॲसिड (Pholic Acid), रायबोफ्लोविन (Riboflavin), कॉपर (Copper) आणि मॅग्नेशियमसारखे (Magnesium) मायक्रोन्यूट्रियंट्सही असतात. हे मायक्रोन्यूट्रियंट्स (Micronutrients) केस निरोगी ठेवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी चांगले असतात. मोड आलेली कडधान्यं उकळत्या पाण्यात 2 मिनिटांपर्यंत ठेवून द्या किंवा कमी पाण्यात उकळू शकता. यामुळे त्यातील पोषणमूल्य कमी होत नाहीत आणि पचण्यासही ती हलकी होतात. मोड आलेल्या कडधान्यांपासून तुम्ही स्प्राऊट सॅलड (Sprout Salad), स्प्राऊट भेळ असे पदार्थ तयार करून खाऊ शकता. हेही वाचा - तोंडातील अल्सरकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते काही आजारांचे प्राथमिक लक्षण मल्टीग्रेन फ्लेक्स (Multigrain Flakes) ओट्स, व्हीट फ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स, जवस, नाचणी, मुरमुरे, ज्वारी आणि राईस प्लेक्सचं मिश्रण मल्टीग्रेन फ्लेक्स हाही एक चांगला पर्याय आहे. कोणत्याही जेवणानंतरच्या गॅपमध्ये भूक लागल्यास खाण्यासाठी हे उत्तम स्नॅक (Healthy Snack) आहे. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. तर फायबर, बी व्हिटॅमिन, झिंक, कॉपर आणि मॅग्नेशियमसारखे अँटीऑक्सिटंड्स भरपूर प्रमाणात असतात. फळांचं सॅलड (Fruit Salad) तिशीपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी विविध प्रकारची हंगामी फळ आणि त्यापासून तयार करण्यात आलेली सॅलड्स अवश्य खावीत. फळं आणि भाज्या नियमित खाल्ल्याने (Include Fruits and Vegetables in Daily Diet) हृदयरोग, डायबेटिस, लठ्ठपणा, कॅन्सर आणि ब्लड प्रेशरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. फळात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती (Improves Immunity) वाढायला मदत होते. डाएटरी फायबर (Dietary fibre), व्हिटॅमिन सी (Vitamin C), पोटॅशियम (Potassium ), फॉलेटही (Folate) फळांमध्ये भरपूर असतात. विविध रंगांची फळं जर तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट, दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये समाविष्ट केलीत तर त्यामुळे खूप फायदा होतो. याच्या टॉपिंग्जसाठी तुम्ही मध, दही किंवा ताजं क्रीम वापरू शकता. हेही वाचा - Clothes Drying Tips : पावसाळ्यातही कपडे सुकवण्याचं आता नो टेन्शन; या सोप्या पद्धतीने झटपट वाळतील ओट्स (Oats) ओट्स हे एक महत्त्वाचं हेल्दी धान्य (Healthy Grain) आहे. सहसा ब्रेकफास्टमध्ये ओट्सचा समावेश केला जातो. ओट्समध्ये विरघळणारी आणि न विरघळणारं फायबर असतं. वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी (Helps to reduce Cholestral ) करण्यात, डायबेटिसच्या पेशंटची ब्लड शुगर नियंत्रित (Controls Blood Sugar) करण्यात याचा खूप उपयोग होतो. ओट्समध्ये प्रोटिन (Protein), फायबर (fibre), आवश्यक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सही (Minerals) भरपूर असतात. ओट्सचे दलिया, उत्तपा, उपमा, डोसा, इडली, मफीन्स, ग्रेनोला बार आणि कुकीज असे अनेक पदार्थ तयार केले जाऊ शकतात. ओट्स आणि भाज्या अशी एकत्र खिचडीही अत्यंत पौष्टिक असते. ताक (Buttermilk) ताकामध्ये पाण्याचं प्रमाण 90% असतं. शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी ताक फायदेशीर ठरतं. यामध्ये प्रोटिन, व्हिटॅमिन, पचनासाठी आवश्यक ते बॅक्टेरिया म्हणजेच प्रोबॅक्टेरियाही असतात. ताक तुम्ही जेवणाबरोबर किंवा दोन जेवणांच्या मध्येही पिऊ शकता. शिंगाड्याच्या पिठाचा पॅनकेक (Chestnut Pancake) शिंगाड्यात प्रोटिन आणि व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं. तुमच्या हेल्दी आहारासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये कमी कॅलरीज (Low Calory Food) असतात. व्हिटॅमिन्स आणि फायबर्सही शिंगाड्यात भरपूर असतात. डायबेटिसच्या रुग्णांसाठी शिंगाडे अत्यंत चांगले असतात. डिटॉक्स करण्यामध्ये आणि शरीराला थंडावा देण्यामध्ये शिंगाड्याचा उपयोग होतो. शिंगाड्याच्या पिठात शेंगदाणे, भाज्या घालून डोसा किंवा ढोकळा करु शकता. हेही वाचा - Healthy Food : केवळ वजन कमी करण्यासाठी खाता ओट्स? 'हे' फायदे वाचून थक्क व्हाल कैरीचं पन्हं कैरीचं पन्हं हे अत्यंत चविष्ट आणि ताजंतवानं करणारं पेय आहे. कच्च्या कैरीपासून हे पन्हं तयार केलं जातं. यामध्ये उष्णता प्रतिरोधक गुण असतात. कैरीचं पन्हं हे बी1, बी2, नियासिन, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चं उत्तम स्रोत आहे. जठराचे कोणतेही आजार असल्यास (GI Diseases) कैरीचं पन्हं अत्यंत गुणकारी ठरतं. तसंच त्वचा आणि डोळ्यांसाठीही पन्हं चांगलं असतं. शरीरातील अतिरिक्त आयर्न आणि मिठाला घामाच्या माध्यमातून बाहेर फेकण्यात कैरीच्या पन्ह्याचा उपयोग होतो. कैरीच्या पन्ह्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठताही दूर होते. फ्रूट योगर्ट (Fruit Yoghurt) योगर्ट हे डेअरी प्रोटिन (Dairy Protein), कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 12, लिनोलेईक ॲसिड आणि गुड फॅटी ॲसिडचा (Good Fatty Acid) उत्तम स्रोत मानलं जातं. फळं आणि दही हे एक अत्यंत पौष्टिक मिश्रण आहे. फळांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि हे मिश्रण अँटिऑक्सिडंट (Antioxidents), प्रोबायोटिक्स फायबर्स (Probiotic Fibbers) आणि पॉली फेनोलचे उत्तम स्रोत मानले जातात. पचनासाठी हे उत्तम आहे. दही प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. दही आणि फळं एकत्र केल्यास प्रोबायोटिकिस, उच्च दर्जाचे प्रोटीन, आवश्यक फॅटी ॲसिड आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात. वजन कमी करण्यात, डायबेटिस आणि हृदयरोगावर हे मिश्रण अत्यंत गुणकारी आहे. ड्रायफ्रुट्स (Dry fruits) हृदयासाठी ड्रायफ्रूट्स म्हणजेच सुकामेवा अत्यंत गुणकारी मानला जातो. यामध्ये प्रोटिन्स, अनसॅच्युरेटेट फॅटी ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. शरीरातील एचडीएल म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल ( Good Cholesterol) वाढवण्यात याची मदत होते. ड्रायफ्रुट्समध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ड्रायफ्रुट्स मर्यादित प्रमाणातच खाल्ली पाहिजेत. एका दिवसात एक मुठभरूनच ड्रायफ्रूट्स खावेत. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, अंजीर, जर्दाळु आणि खजूर हे गुड नट्स आहेत. आयुष्याचा प्रत्येक क्षण एंजॉय करायचा असेल तर तुमचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. त्यासाठी वरील टिप्स नक्की वाचा आणि तुमचा आहार चौरस असेल याची काळजी घ्या.
First published:

Tags: Food, Lifestyle

पुढील बातम्या