तुमच्या मुलांना फिट ठेवायचं असेल, तर त्यांना शाळेत 'असं' पाठवा

जी मुलं जास्त सायकलिंग करतात किंवा पायी चालतात त्यांना भविष्यात लठ्ठपणाला सामोरे जावं लागत नाही.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 08:29 PM IST

तुमच्या मुलांना फिट ठेवायचं असेल, तर त्यांना शाळेत 'असं' पाठवा

मुंबई, 24 मे : नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात जी मुलं सायकलिंग करतात किंवा जास्त पायी चालतात, त्यांना इतर मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाचा धोका कमी असतो ही बाब स्पष्ट झाली.

यासंदर्भात 'बीएमसी पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संशोधकांनी प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणावर अभ्यास केला. त्यातच नियमित सायकलने शाळेत जाणाऱ्या मुलांचा आणि विविध खेळातं सहभागी होणाऱ्या मुलांचा अभ्यास करण्यात आला. जी मुलं पायी किंवा सायकलने शाळेत जातात त्या मुलांना कार किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणाऱ्या मुलांच्या तुलनेत लठ्ठपणाचा कमी धोका असतो हे त्यात स्पष्ट झालं.


World Thyroid Day 2019 : थायरॉईडचा आजार होऊच नये यासाठी करा 'हे' उपाय

लहान मुलांमधील लठ्ठपणाची रिस्क चेक करताना संशोधकांनी शाळेत जाणाऱ्या तीन हजार मुला-मुलींच्या बॉडी मास इंडेक्सची तपासणी केली. यात थक्क करणारी आकडेवारी त्यांच्या समोर आली. कोणत्याही खेळात सहभागी न होणाऱ्या मुलांच्या तुलनेत, जी मुलं कुठल्या ना कुठल्या खेळात सहभागी होतात त्यांचं वजन न खेळणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी होतं असं आढळून आलं.

Loading...


ससंच जी मुलं अॅक्टिव्ह नव्हती त्यांच्यात जास्त लठ्ठपणा आणि त्यांचं वजनही जास्त होतं असं संशोधकांना आढळून आलं. जी मुलं जास्त सायकलिंग करतात किंवा पायी चालतात त्यांना भविष्यात लठ्ठपणाला सामोरे जावं लागत नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...