सुपर स्प्रेडरमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय? काय आहे तज्ज्ञांचं मत

सुपर स्प्रेडरमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतोय? काय आहे तज्ज्ञांचं मत

आपल्याला कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला आहे हे माहित नसल्याने असिम्प्टोमॅटिक (लक्षणे नसलेले) रुग्ण नकळतपणे संसर्ग फैलावण्यासाठी कारणीभूत ठरतात.

  • Share this:

नवी दिल्ली,18 डिसेंबर : आपल्याला कोरोनाचा (Corona) संसर्ग झाला आहे हे माहित नसल्याने असिम्प्टोमॅटिक (लक्षणे नसलेले) रुग्ण नकळतपणे संसर्ग फैलावण्यासाठी कारणीभूत ठरतात. ज्या व्यक्ती आपल्या नाकाची स्वच्छता ठेवत नाहीत, त्यांच्यामार्फत देखील संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असतो.

देशाभरात कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग पाहता, त्या अनुषंगाने सातत्याने नवीन संशोधन समोर येताना दिसत आहे. जगभरातील संशोधक कोरोनावर संशोधन करीत आहेत. असे काही लोक आहेत की जे कोरोना संसर्ग पसरण्यात सुपर स्प्रेडर (Super Spreader) म्हणून काम करीत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हा प्रकार नेमका काय आहे हे जाणून घेऊया...

संशोधनानुसार, असिम्प्टोमॅटिक (asymptomatic) रुग्ण कोरोनाचे सुपर स्प्रेडर म्हणून ओळखले जातात. असिम्प्टोमॅटिक म्हणजे असे रुग्ण की ज्यांना कोरोनाचा संसर्ग (Corona) झाला आहे, परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यांचे आरोग्य एकदम स्वस्थ असते. या नव्या संशोधनानुसार जे लोक आपल्या नाकाची स्वच्छता ठेवत नाहीत, अशा लोकांमुळे देखील कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका असतो. अशा लोकांच्या माध्यमातून संसर्गजन्य कोरोनाचे 60 टक्के थेंब (Droplets) तयार होतात.

संशोधनानुसार, शिंकल्याने माणसाच्या तोंडातील लाळ थेंबांच्या रूपात बाहेर फेकली जाते, त्यामुळे देखील कोरोनाचा प्रसार होऊ शकते. त्यात पातळ, मध्यम आणि घट्ट लाळेचा समावेश असतो. जर तोंडातील लाळ पातळ असेल तर शिंकल्यानंतर त्याचे थेंब हवेत बराचकाळ राहू शकतात. जर संसर्ग झालेली व्यक्ती शिंकली तर त्यातून निघणाऱ्या अशा थेंबांमुळे सुदृढ व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींच्या दातांमध्ये फट असते, अशा व्यक्ती अधिक संसर्ग पसरवू शकतात. शिंका येताच अशा व्यक्तींच्या तोंड आणि नाकावर अधिक जोर पडतो, त्यातच त्यांच्या दातांमध्ये फट असल्याने तोंडातील थेंब जास्त प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे संसर्ग अधिक प्रमाणात फैलावू शकतो.

WWW.myupchar.com शी निगडीत असलेल्या डॉ. अजय मोहन यांच्या म्हणण्यानुसार, घराबाहेर पडल्यानंतर मास्क बिल्कुल काढू नये. तसेच बाहेरील पदार्थ खाणं कटाक्षानी टाळावं. जर फारवेळ घराबाहेर थांबावं लागणार असेल तर स्वतःची पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ सोबत न्यावेत म्हणजे बाहेरील पदार्थ खाणं टाळता येईल. शक्यतो लांबचा प्रवास टाळावा. सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळावा. तसंच हात स्वच्छ करण्यासाठी सातत्याने सॅनिटायझरचा वापर करावा. बाहेरील कोणत्याही वस्तुला किंवा जागेला हात लावल्यानंतर तातडीने सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. बाहेरुन घरात आणलेल्या वस्तु सॅनिटाईज कराव्यात, तसेच भाजीपाला व फळे स्वच्छ धुवून सुकवावेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एखादी व्यक्ती कितीही ओळखीची किंवा जवळची असली तरी त्याच्या सोबत बोलताना मास्क काढू नये, कारण कोणाला संसर्ग झालाय हे लगेच लक्षात येणे कठीण असते.

myupachar च्या म्हणण्यानुसार, रोज गरम पाण्याने गुळण्या कराव्यात, तसेच वाफ घ्यावी. रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. सकाळच्यावेळी संत्री, सफरचंदासारखे एखादे फळ खावे, कारण या फळांमध्ये फायबर आणि क जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असते.

(याबाबत अधिक माहितीसाठी कोरोना व्हायरस संक्रमण हा आमचा लेख वाचावा.)

(न्यूज 18 वर आरोग्यासंबंधी लेख myupachar.com कडून लिहिले जातात. आरोग्यविषयक सत्यतापूर्ण बातम्यांसाठी myupachar.com हा खात्रीशीर स्त्रोत समजला जातो. myupachar मध्ये संशोधक, पत्रकार आणि डॉक्टर्स आरोग्यविषयक माहिती देत असतात.)

--------------

डिस्क्लेमर : या लेखातील माहिती काही आरोग्यविषयक परिस्थिती आणि त्यावरील संभाव्य उपचारांच्या संदर्भात शैक्षणिक हेतूंसाठी आहे. ही माहिती कोणत्याही परवानाधारक डॉक्टर्सव्दारे केल्या जाणाऱ्या सेवा, निदान किंवा उपचाराला पर्याय ठरु शकत नाही. जर तुमचे बालक किंवा जवळचे नातेवाईक कोणत्याही आरोग्यविषयक समस्येचा सामाना करीत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही आरोग्याशी संबंधित समस्या किंवा रोगाचे निदान तसेच उपचारासाठी येथे दिलेल्या माहितीचा वापरू नये. जर आपण असे केले आणि काही तुमचे काही नुकसान झाले तर त्यास myupachar किंवा News18 जबाबदार नसतील

Published by: Kranti Kanetkar
First published: December 18, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या