• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • 'Corona काळात आरोग्याला घातक ठरताहेत Food Pockets', डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा!

'Corona काळात आरोग्याला घातक ठरताहेत Food Pockets', डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा!

कोरोनाच्या काळात (Coronavirus) पाकिटबंद पदार्थ आणखी हानी पोहोचवत असल्याची भीती विविध आरोग्य संघटनांनी व्यक्त केली आहे.

 • Share this:
  दिल्ली, 2 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात (CoronaVirus latest news) लोकांचे आरोग्य धोक्यात (Health Care) आलेले असताना आता आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक संभावित धोका निर्माण झाला आहे. पाकिटबंद स्थितीत (Food Pockets) येणारे खाद्यपदार्थांमुळे आता आरोग्याला हानी पोहोचवत असल्याची भीती विविध आरोग्य संघटनांनी (Health Organization) केली आहे. अनेक देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ (Tobacco Products) आणि इतर खाद्यपदार्थ हे बंद पॉकेटमध्ये मिळत असल्याने यापासून आरोग्याला धोका पोहचतो आहे. त्यामुळे वेगवेगळ्या घातक आजारापासून बचाव करण्यासाठी या पद्धतीने अन्नपदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार देत आहेत. पॉकेटबंद पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण अधिक असतं. विशेष म्हणजे हे पदार्थ अधिक काळ पॉकेटबंद राहतात, ते शिळे अन्न आहारात आल्यामुळे ह्रदयविकाराच्या आणि फेफड्याचे आजार होतात. त्यामुळे आता शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी आहारात समावेश असणाऱ्या पदार्थांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागणारी आहे. पॉकेटबंद खाद्यपदार्थांवर तशा सूचना देण्याची मागणी! पॉकेटबंद खाद्यपदार्थांवर आरोग्यासंदर्भातील धोक्यांच्या सुचना देण्यात याव्यात अशी मागणी काही आरोग्य संघटना करत आहेत. त्यामध्ये न्यूट्रिशन एडवोकेसी इन पब्लिक इंटरेस्ट (NAPI), इंडियन एसोसिएशन ऑफ प्रिवेंटिव अँड सोशल मेडिसिन (IAPSM), पीडियाट्रिक अँड एडोलसेंट न्यूट्रिशन सोसायटी, एपिडेमियोलॉजी फाउंडेशन ऑफ इंडिया, ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (BPNI) अशा नामांकित आरोग्य संघटनांचा समावेश आहे. आरोग्याचा दृष्टीने योग्य काळजी घ्या! या विषयावर ब्राझीलमधील पाउलो विद्यापीठातील सेंटर फॉर न्यूट्रीशन्स या विषयाचे प्राध्यापक नेहा खंडपूर यांनी पॉकेटबंद अन्नपदार्थांवर खबरदारीचा इशारा देण्यासाठी विविध संशोधनांचा हवाला देताना ते आरोग्यासाठी कसे हानीकारक आहेत, हे सिद्ध केले आहे. मीठ, तंबाखूजन्य पदार्थ आणि साखर हे पदार्थ आरोग्याला बाधा पोहचवत असल्याचा त्यांचा दावा आहे. एपिडेमियोलॉजी फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या संशोधकांनीही या काही विशिष्ट कंपनीच्या नफ्याआधारीत व्यवस्थेतून मानवी आरोग्य धोक्यात घातले जात आहे, अशी भूमिका घेतली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर ठणठणीत राहण्यासाठी फॉलो करा 'हा' डाएट आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार! इंडियन असोसिएशन ऑफ प्रिवेंटीव अँड सोशल मेडीसिनचे (IAPSM) अध्यक्ष डॉ. सुनील गर्ग यांनी पॉकेटबंद अन्नपदार्थ पद्धतीचा विरोध करताना म्हटलंय की कंपनीने त्यावर हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं स्पष्टपणे लिहावं आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यविषयक मूलभूत अधिकारांचे रक्षण करायला हवे, अशी मागणी केली आहे. पॉकेटबंद अन्नपदार्थांचा वाढतोय वापर! न्यूट्रीशन्स एडवोकेसी इन पब्लिक इंटरेस्ट (NAPI) या संस्थेचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पोषण परिषदेचे माजी सदस्य डॉ. अरुण गुप्ता यांनी पॉकेटबंद पदार्थांमुळे भारतात लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जर यावर लवकर बंदी घातली गेली नाही तर भारताचा अमेरिका आणि ब्रिटन अशा लठ्ठपणाने ग्रस्त देशातील यादीत समाविष्ट होऊ शकतो. जोपर्यंत यासंदर्भात कडक नियमावली जाहीर करण्यात येणार नाही, तोपर्यंत संबंधित कंपन्या फक्त नफा कमावण्याच्या उद्देशाने या पदार्थांची अधिक विक्री करतील, असं भाकीतही डॉ. गुप्ता यांनी केले आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: