मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तिशीनंतरही हृदय राहील पूर्वीसारखे तरुण, फक्त दैनंदिन आयुष्यात करा हे छोटे बदल

तिशीनंतरही हृदय राहील पूर्वीसारखे तरुण, फक्त दैनंदिन आयुष्यात करा हे छोटे बदल

'पेराल तसं उगवतं' ही म्हण आपल्या हृदयाच्या तिशीनंतरच्या वयातल्या प्रतिसादाबद्दल अगदी चपखलपणे लागू पडते. भविष्यात चांगल्या आरोग्याचा लाभ उगवायला हवा असेल, तर आपल्याला आत्ता काय पेरायला हवं, याबद्दल आता जाणून घेऊ या.

'पेराल तसं उगवतं' ही म्हण आपल्या हृदयाच्या तिशीनंतरच्या वयातल्या प्रतिसादाबद्दल अगदी चपखलपणे लागू पडते. भविष्यात चांगल्या आरोग्याचा लाभ उगवायला हवा असेल, तर आपल्याला आत्ता काय पेरायला हवं, याबद्दल आता जाणून घेऊ या.

'पेराल तसं उगवतं' ही म्हण आपल्या हृदयाच्या तिशीनंतरच्या वयातल्या प्रतिसादाबद्दल अगदी चपखलपणे लागू पडते. भविष्यात चांगल्या आरोग्याचा लाभ उगवायला हवा असेल, तर आपल्याला आत्ता काय पेरायला हवं, याबद्दल आता जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 जानेवारी : आपल्यापैकी अनेकांचं हृदय त्यांच्या वयाच्या तिशीत आरोग्यपूर्ण आणि चपळाईने हालचाली करणारं असेल. 'पेराल तसं उगवतं' ही म्हण आपल्या हृदयाच्या तिशीनंतरच्या वयातल्या प्रतिसादाबद्दल अगदी चपखलपणे लागू पडते. भविष्यात चांगल्या आरोग्याचा लाभ उगवायला हवा असेल, तर आपल्याला आत्ता काय पेरायला हवं, याबद्दल आता जाणून घेऊ या. बेंगळुरू रिचमंड रोड फोर्टिस हॉस्पिटल येथील डायरेक्टर - इंटरव्हेशनल कार्डिऑलॉजी डॉ. राजपाल सिंग यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

नियमित व्यायाम

उच्च रक्तदाब, डायबेटीस, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी, असे विकार हृदयविकार होण्याची शक्यता वाढवतात. त्यामुळे ते विकार न होण्यासाठी शारीरिक व्यायामाची सवय लावणं हा सर्वोत्तम उपाय आहे. तसं झालं तर हृदयविकार होण्याची जोखीम कमी होते. कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम, खेळ, पोहणं किंवा निव्वळ चालणं यांपैकी कोणताही व्यायाम करू शकता. अर्थात चालणं वेगाने आणि घाम येईल इतपत हवं. दररोज 40 मिनिटं किंवा आठवड्यातून पाच वेळा चालण्याचा व्यायाम करायला हवा.

योग्य आहार

प्रोटीन्स अर्थात प्रथिनांनी समृद्ध असलेला आणि कार्बोहायड्रेट्स व फॅट्स कमी असलेला आहार हवा. त्यासोबत योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट्स आणि ताजी फळं रोजच्या आहारात घेणं, मीठ कमीत कमी खाणं, पुरेशा प्रमाणात पाणी पिणं आणि मद्यपान (करत असल्यास) मर्यादित स्वरूपात करणं आवश्यक आहे. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी ठरावीक अंतराने थोडं थोडं खाणं श्रेयस्कर.

धूम्रपान टाळा

धूम्रपान हा हृदयाचा सर्वांत वाईट शत्रू आहे. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका दुप्पट असतो. तसंच, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता 3-4 पट अधिक असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान बंद केलं, तर त्याला हृदयविकार होण्याची शक्यता वर्षभरात निम्म्यावर येते. तसंच, दोन वर्षांत ती शक्यता धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या पातळीवर येऊ शकते.

पॅसिव्ह स्मोकिंग अर्थात अप्रत्यक्ष धूम्रपानामुळेही प्रत्यक्ष धूम्रमानाइतकेच तोटे होतात. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती कोणत्याही वयाच्या असोत, त्यांनी धूम्रपान थांबवणंच इष्ट. खासकरून वयाच्या तिशीत असलेल्या किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांनी तर धूम्रपान थांबवायलाच हवं.

आरोग्य तपासणी

'उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा' अशी म्हण आहे. एकदा वयाची तिशी ओलांडली, की वर्षातून एकदा तरी हृदय आणि अन्य शारीरिक चाचण्या नियमितपणे करून घेण्याची शिफारस केली जाते.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, डायबेटीस, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या व्यक्ती, तसंच कमी वयात हृदयरोग होण्याचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्ती यांना हृदयविकार होण्याचा धोका जास्त असतो. त्यांनी हृदयविकारतज्ज्ञांची भेट घेऊन आरोग्याच्या स्थितीचं मूल्यमापन करून घेतलं पाहिजे.

वरच्या सर्व बाबी एकाच वेळी अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. तसंच चांगली झोप आणि सकारात्मक विचारांची जोड त्याला पाहिजे. तसं झालं तर तिशीनंतरच्या वयात हृदय आनंदी आणि आरोग्यपूर्ण राहील.

First published:

Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle