नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमता

चुकीच्या सवयी आणि दिनचर्येमुळे मेंदूतल्या पेशी होतात नष्ट

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 10:42 PM IST

नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमता

मुंबई, 25 मे : चुकीच्या सवयी आणि दिनचर्येमुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. मेंदू स्ट्राँग म्हणजेच तल्लख ठेवण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करायला हवा. आज आम्ही तुम्हाला मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठीचे उपाय सांगणार आहोत.

जंक फूड ठेव दूर - दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात जर तुम्ही सँडविच, स्नॅक्स, समोसे तसंच चायनीज खात असाल तर ही सवय ताबडतोब बंद करा. जंकफूड हे मेंदूतील पेशींसाठी जास्त धोकादायक ठरतात.

कॉफीच्या अतिसेवनामुळे वाढतो 'या' रोगाचा धोका; रिसर्चमध्ये आलं समोर

अनावश्यक ताण - जेव्हा तुमची स्ट्रेस लेव्हल नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा तुमच्या मेंदूत कोर्टिसोल नावाचं एक रसायन तयार होतं. ज्यामुळे मेंदूतल्या पेशी नष्ट होतात. म्हणून शक्यतोवर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

भरपूर झोप - मेंदू तल्लख आणि कार्यक्षण ठेवायचा असेल तर तुमची पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. झोप पूर्ण न होण्याची अनेक कारणं असली तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. मेंदू तल्लख ठेवायचा असेल तर पुरेशी झोप घ्या.

Loading...

पौष्टिक आहार - प्रक्रिया केलेल्या अन्नामधील घटक तुमच्या मेंदूतल्या पेशींच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे पोषक तत्त्व असलेला आहेर तुम्ही घ्यायला हवा.

तुमच्या मुलांना फिट ठेवायचं असेल, तर त्यांना शाळेत 'असं' पाठवा

अति मद्यप्राशन  - मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीचं स्वतःवर अजिबात नियंत्रण राहत नाही. अति मद्यप्राशनामुळे सर्वात जास्त ब्रेन सेल्स डॅमेज होतात. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी ही सवय ताबडतोब बदलायला हवी.

पाण्याची कमतरता - शरीराच्या व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या मेंदूला पाण्याची सगळ्यात जास्त गरज असते. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मेंदूतील पेशींवर त्याचा परिणाम होतो. पाण्याअभावी मेंदूतल्या पेशी मृत पावतात.

नियमित व्यायाम - नियमित व्यायाम केल्याने मेंदूला जास्त होणारा रक्तपुरवठा होतो. वेगाने चालणे हा मेंदूसाठी सर्वात फायदेशीर व्यायाम आहे. यामुळे केवळ तुमची स्ट्रेस लेव्हलच कमी होत नाही. मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 25, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...