मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /औषध वगैरे सोडा! वजन कमी करण्यासाठी आजच वापरायला सुरुवात करा ही पावडर

औषध वगैरे सोडा! वजन कमी करण्यासाठी आजच वापरायला सुरुवात करा ही पावडर

सुंठ खाण्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

सुंठ खाण्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.

HEALTH Benefits Of Dry Ginger: जेवणात वापरली जाणारी ही पावडर आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठीची अत्यावश्यक पूड आहे.

दिल्ली,1 जून : आल्याचा  (Ginger) वापर तर, आपण नियमितपणे जेवणामध्ये करतो मात्र, अनेकांना सुंठ पावडर देखील आरोग्यासाठी चांगली आहे (Good for Health).हे माहीतच नसतं. जेवणाची चव वाढवणारी सुंठ पावडर वजन कमी कमी (Weight Loss) करण्यासाठी ही वापरता येऊ शकते. सुंठ पचनाचे विकार बरे करते आणि रक्तामधली कोलेस्ट्रॉलची पातळी (Blood cholesterol Level)कमी करते जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी

सुंठ खाण्याने वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. सुंठ म्हणजेच सुकलेलं आलं पचनशक्ती चांगली करून वजन कमी करायला मदत करतं. सुंठ रक्तातली चरबी कमी करून रक्तामधील ग्लुकोजची पातळी नियंत्रीत ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे भूक कमी लागते. सुंठ जेवणामध्ये वापरल्यास लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जेवण  पचायला जास्त वेळ मिळतो. सुंठ पावडर पाण्यात किंवा दुधात मिसळून पिल्याने वजन कंट्रोलमध्ये राहतं.

(Work form Home च्या जास्तीच्या तासांनी वाढतायत मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट)

ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करते

बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराईड कमी करण्यास सुंठ मदत करते. एलडीएल लिपोप्रोटीन म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यास हार्ट अटॅकची धोका वाढतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्यांनी नियमितपणे सुंठ पावडर खावी.

पचनशक्ती वाढेल

सुंठ पावडर पोटाचे विकार बरे करून पचशक्ती सुधारतं. सुंठ पावडर खाण्याने पोट दुखी, अपचन असे त्रास कमी होतात. तसेच बद्धकोष्टचा त्रास असेल कर, त्यातून देखील सुटका होते.

(प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?)

पाळीचा त्रास

पाळीच्या दिवसात पोट आणि कंबर दुखीचा त्रास असेल तर, सुंठ पावडरने फायदा होतो, सुठं पावडर मुळे अंगदुखीचा त्रासही कमी होतो. डिलिव्हरीनंतर महिलेचं शरीर आतून साफ होण्यासाठी महिलांना सुंठ पावडर खाण्यास दिली जाते. डिलिव्हरी नंतर दिला जाणारा पौष्टीक आहार सुंठ पावडर टाकून बनवला जातो.

उलटीचा त्रास

महिलांना प्रेग्नेंसी दरम्यान होणाऱ्या उलट्यांसाठी किंवा मॉर्निंग सिकनेससाठी औषधी आहे. त्यासाठी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि मध मिसळून पिता येतं.  मात्र, प्रेग्नेंसी दरम्यान हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

(OMG! या 5 कारणांमुळे लग्नानंतर वाढतं महिलांचं वजन)

शुगर कंट्रोल

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी देखील सुंठ ओळखली जाते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडीशी सुंठ पावडर मिसळून पिल्याने फायदा होतो.

सूज कमी करण्यासाठी

मीठ आणि सुंठ एकत्र करून घेतल्यास शरीरावरची सुज कमी होते सांध्यांना आणि बोटांना सूज येत असेल तर, या मिश्रणाने फायदा मिळतो.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Home remedies, Weight loss