केळ्यापेक्षा जास्त पोषक आणि हृदयविकाराला दूर ठेवतं हे विदेशी फळ! आता महाराष्ट्रातही होतेय लागवड

अ‍ॅव्होकॅडो (Avocado) हे फळ आरोग्याला अतिशय फायदेशीर आहे. या अमेरिकन फळाची लागवड आता आपल्या राज्यातही केली जाणार आहे, कृषीमंत्र्यांनीच ही माहिती दिली.

  • Share this:

महाराष्ट्रात अ‍ॅव्होकॅडो अर्थात (लोणी फळ) फळाची लागवड आता महाराष्ट्रातही करण्यात येणार असून दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे.

कृषीमंत्री भुसे यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी जगाच्या पाठीवर जे काही उत्कृष्ट संशोधन आहे त्याचा वापर केला पाहिजे. कोकणतील हवामान या फळाला पोषक असून त्याची लागवड यशस्वी झाल्यास कृषी क्षेत्रात क्रांती ठरेल असे ते म्हणाले.

मुळचे अमेरिकेचे फळ असून त्याला बाजारात मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांमध्ये अद्याप त्याचा प्रसार कमी असून आरोग्याच्या दृष्टीने या फळाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो.

या फळात ऊर्जा मोठ्या प्रमाणात असून रक्तातील साखर वाढू न देता ऊर्जा देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर या फळात प्रथिने जास्त आणि कर्बोदके कमी असतात.

सध्या भारतात या फळाची उलाढाल 50 कोटी रुपयांच्या आसपास असून सुधारित जातीच्या लागवडीची निर्यात केल्यास अधिक उत्‍पन्न मिळू शकते.

अ‍ॅव्होकॅडोच्या मालूमा, हास, पिंकर्टन या जातीच्या फळाला जगभर मागणी आहे. कोकण कृषी विद्यापीठामध्ये मालूमा, हास या जातींची लागवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात यावर्षी 8 ते 10 शेतकऱ्यांकडे या फळाची लागवड प्रस्तावीत असून जांभळा आणि पिवळसर राखाडी रंगाच्या स्थानिक जाती आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 12:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading