Home /News /lifestyle /

Vat Purnima 2022 : वटपूजेमुळे पतीच्या दीर्घायुष्यासोबतच पत्नीलाही मिळू शकतं उत्तम आरोग्य, ही बाजू माहीत आहे का?

Vat Purnima 2022 : वटपूजेमुळे पतीच्या दीर्घायुष्यासोबतच पत्नीलाही मिळू शकतं उत्तम आरोग्य, ही बाजू माहीत आहे का?

वटपौर्णिमेचे व्रत (Vat Purnima 2022) केल्यामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळतं, अशी श्रद्धा आहे. मात्र वडाच्या झाडाची पूजा करणे किंवा या झाडाच्या सानिध्यात काही काळ घालवणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. काय आहे या व्रताची Environmental side?

पुढे वाचा ...
  मुंबई, 13 जून : आपल्याकडे वटपौर्णिमा व्रताला खूप महत्त्व आहे. हे व्रत ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते. पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी महिला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची तसेच वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा करतात. यावर्षी मंगळवारी म्हणजेच 14 जूनला (Vat Purnima 2022) हे व्रत केले जाणार आहे. अशी मान्यता आहे की वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते. मात्र वटपोर्णीमेचा फायदा केवळ इतकाच नाही. वडाच्या झाडाची पूजा करणे किंवा या झाडाच्या सानिध्यात काही काळ घालवणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असते (Vat Purnima Importance). त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केल्याने नकळत महिलांनाही त्याचे अनेक फायदे मिळतात.  या व्रताच्या पर्यावरणीय फायद्यांविषयी माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा केल्याने नक्की काय फायदे होतात याबद्दल सांगणार आहोत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ऑक्सिजन. होय, ऑक्सिजनला आपण प्राणवायू म्हणतो. कारण ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी एकूणच आपल्या जगण्यासाठीच खूप आवश्यक असतो (Banyan Tree For Good Health). वडाचे झाड 24 तास आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करत असते. सध्याच्या धावपळीच्या काळात आल्याला स्वतःसाठी मोकळा वेळ काढणं शक्य होत नाही. अशात वटपौर्णिमेला महिला आवर्जून आणि अगदी उत्साहात वडाच्या झाडाचे पूजन करतात आणि त्यानिमित्ताने त्या बराचवेळ वडाच्या झाडाच्या सानिध्यात घालवतात. यामुळे त्यांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. याचा फायदा त्यांच्या शरीराराला तर होतोच. मात्र त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे त्यांच्यामध्ये नवचैतन्य आणि नवी ऊर्जा निर्माण होते.

  ‘या’ 5 पांढऱ्या वस्तू हातातून पडणं आहे अशुभ, जाणून घ्या काय सांगते शास्त्र

  वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. नंतर मनोभावे वडाची पूजा करतात. यातून त्यांच्या प्रेमाची त्यांना नव्याने जाणीव होते आणि नवरा बायकोचं सुंदर नातं नव्याने अधिक घट्ट होत जातं. Vat Purnima Vrat 2022 : उद्या आहे वटपौर्णिमा, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि पद्धत शिवाय महिलांची नटण्या मुरडण्याची हौसदेखील यानिमित्ताने पूर्ण होते. हल्ली आपल्या नात्यांमध्ये ताणतणाव वाढले आहेत. वडाचे झाड हे एकजुटीचे आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. वडाच्या पारंब्या जशा एकमेकांना धरून राहतात. तसेच आपण आपल्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना सांभाळलं पाहिजे. हाच संदेश वादाचे झाड देत असते. वडाची पूजा करताना महिला एकमेकींची विचारपूस करतात. एकमेकांसोबत सुखदुःखाची देवाण घेवाण करतात. यातून नवे आणि अधिक चांगले ऋणानुबंध निर्माण होतात. वटपूजेदरम्यान होणाऱ्या वाणाच्या देवाणघेवाणीमुळे कुणालातरी काहीतरी देण्याची आपली भावना प्रबळ होते. यावेळी आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर नाहीसा होतो.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Culture and tradition, Festival, Health Tips, Religion

  पुढील बातम्या