तुमच्या डब्यात हे ड्रायफ्रूट असेल तर चिंता विसरा, अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय

तुमच्या डब्यात हे ड्रायफ्रूट असेल तर चिंता विसरा, अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय

आंबड गोड चवीचे मनुके पदार्थांची चव अधिक चांगली करून जातात. पण एक लहानसा मनुका तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का

  • Share this:

मनुक्यामुळे गोड पदार्थांची चव जेवढी वाढते तेवढेच ते इतर ड्रायफ्रूटच्या मानाने याची किंमतही कमी असते. आंबड गोड चवीचे मनुके पदार्थांची चव अधिक चांगली करून जातात. पण एक लहानसा मनुका तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का... आज आपण याच्या फायद्यांबद्दलच अधिक जाणून घेऊ...

शरीरात ताकद येते- दररोज मनुके खाल्ल्यामुळे शरीरात ताकद येते. मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीरात अगदी सहजरित्या पचते. याचमुळे मनुके खाल्ल्यावर शरीरात लगेच ऊर्जा येते. याशिवाय मनुकांमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं, त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे.

वजन कमी होतं- जर तुम्ही लठ्ठपणामुळे त्रासले आहात तर मनुके खाणं तुमच्या फायद्याचं आहे. मनुकांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी शरीरात अगदी सहजरित्या पचते. दररोज मनुके खाल्ल्यामुळे वजन कमी व्हायला मदत मिळते.

बद्धकोष्ठतेची समस्या- जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांच्यासाठी मनुके हे कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. अनेकदा लोक बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी वेगवेगळी औषधं घेतात. पण काहीशा मनुक्यांनी हा त्रास कायमचा जाऊ शकतो. बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी मनुके भिजवून खाणं जास्त फायदेशीर आहे.

हाडं मजबूत होणं- दररोज मनुके खाल्ले तर हाडं सशक्त होण्यासही मदत होते. मनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. यामुळेच दररोज मुठभर मनुके तरी खाल्ले पाहिजेत.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

मोबाइल पाहता- पाहता रेल्वे रुळांवर पडली महिला, समोर आली ट्रेन, पाहा Viral Video

VIDEO: जेव्हा कावळ्याने केला चिमणीच्या बाळावर हल्ला, तेव्हा झालं असं काही...

नदीत तरंगणार हॉटेल होतंय तयार, 2020 च्या बुकिंगलाही झाली सुरुवात

फेवरेट पदार्थ खाऊनही आता वाढणार नाही तुमचं वजन, ही आहेत कारण

वडिलांचं नाव 'मध्यप्रदेश', मुलाचं नाव 'भोपाळ'.. अनोखी आहे नाव ठेवण्याची ही पद्धत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या