• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Methi Water: फक्त 1 महिना मेथीचे पाणी पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे; असा करा उपयोग

Methi Water: फक्त 1 महिना मेथीचे पाणी पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे; असा करा उपयोग

मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर पाण्यात भिजवून (Soaked) त्याचे पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेहामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे (Health Benefits Of Methi Water) आहेत ते पाहुया.

 • Share this:
  मुंबई, 14 नोव्हेंबर : जर तुम्ही महिनाभर मेथीचे पाणी प्यायलात तर तुमचं आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकतं. मेथीचे पाणी बनवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे टाकून झाकून ठेवा. हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्या. तुम्ही महिनाभर असे करा. द हेल्थ साइटच्या माहितीनुसार मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रात्रभर पाण्यात भिजवून (Soaked) त्याचे पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेहामध्येही याचे सेवन फायदेशीर ठरते. मेथीचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे (Health Benefits Of Methi Water) आहेत ते पाहुया. 1. पचन सुधारणे अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी खूप फायदेशीर आहे. मेथीमध्ये असलेले पाचक एंझाइम स्वादुपिंड अधिक अ‌ॅक्टिव करतात, ज्यामुळे पचन सुधारते. यामध्ये भरपूर फायबर असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. 2. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल ठीक राहते. मेथीच्या दाण्यांचे पाणी महिनाभर नियमित सेवन केल्यास शरीरात एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढू लागते आणि त्याचे खूप फायदे होतात. 3.सर्दी, खोकला मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचे तत्व आढळते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो. तुम्ही एक चमचा मेथीचे दाणे कपभर पाण्यात उकळा आणि पाणी अर्धे राहिल्यावर ते गाळून प्या. तुमचा सर्दी-खोकला निघून जाईल. 4. मधुमेहावर नियंत्रण मेथीचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास साखरेवर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते. मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेहामध्ये खूप फायदा होतो. हे वाचा - Car Offer: कार खरेदीवर 50000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स, YONO SBI ची खास ऑफर 5. वजन नियंत्रित राहते सकाळी मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यानं दिवसभराची भूक कमी होते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 6. किडनीसाठी फायदेशीर जर तुम्हाला किडनीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर महिनाभर मेथीचे पाणी प्या. यातील अँटी-ऑक्सिडंट तत्व किडनीसाठी फायदेशीर आहे. 7. हृदयासाठी फायदेशीर मेथी हृदयासाठीही खूप चांगली आहे. यात हायपोकोलेस्टेरोलेमिक तत्व असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. ज्यामुळे हृदय निरोगी राहते. याच्या सेवनाने रक्ताभिसरणही चांगले राहते. हे वाचा - फक्त मॉडेल नव्हे तर ‘डॉक्टर’ आहे Umar Riaz; ‘बिग बॉस 15’ ने दिली प्रचंड लोकप्रियता 8. त्वचेसाठी मेथीचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे स्किन अॅलर्जीची समस्या दूर होते आणि नखांवर मुरुम होण्याची समस्याही दूर होते. त्यात अँटीएजिंग गुणधर्म देखील आहेत आणि त्वचेला हायड्रेट ठेवते. 9.केसांसाठी मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून केसांच्या मुळांमध्ये लावल्यास केस गळणे थांबते आणि चमक येते.
  Published by:News18 Desk
  First published: