थंडी जितकी हवीहवीशी वाटतेच तितकीच नकोशीही आणि याला कारण म्हणजे थंडीत बळावणारे आजार. थंडी म्हटलं की ताप, खोकला हमखास आलाच. थंडीमुळे येणाऱ्या अशा ताप, खोकल्यावर रामबाण उपचार आहे तो तुमच्या स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरातील गरम मसाल्याच्या डब्यात दालचिनी असेलच. ही दालचिनी या ताप-खोकल्यापासून तुम्हाला मुक्ती देईल. दालचिनीचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. कोणते ते जाणून घेऊयात
पोटफुगी आणि भूक न लागणे
दालचिनी, सुंठ आणि वेलदोडे यांची पूड करून एकत्र करावी
जेवणापूर्वी ३ ग्रॅम मधाबरोबर घ्यावी
पोटात गॅस होण्याची आणि भूक न लागण्याची समस्या कमी होते
दालचिनी आणि काताची पूड एकत्र करून मधातून चाटावी, आव थांबते
थंडीपासून ताप
१ ग्रॅम दालचिनी, १ ग्रॅम लवंग आणि १ ग्रॅम सुंठ याचा काढा करावा
हा काढा सकाळ-संध्याकाळ प्यावा
दोन दिवसात बरं वाटेल
यात तुम्ही गवती चहाही टाकू शकता
सुका खोकला
१० ग्रॅम दालचिनी, १० ग्रॅम ज्येष्ठमध, १० ग्रॅम बडीशेप, १० ग्रॅम काळी द्राक्षे, 10 ग्रॅम खडीसाखर, ५० ग्रॅम सोललेले बदाम एकत्रित वाटून मिरीच्या आकाराच्या गोळ्या करा
ही गोळी तोंडात धरावी, सुक्या खोकल्यापासून आराम मिळेल.
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.