तुमची आजी म्हणतेय खरं... थंडीत ओवा खा बरं... फायदे जाणाल तर तुम्हीही व्हाल थक्क

तुमची आजी म्हणतेय खरं... थंडीत ओवा खा बरं... फायदे जाणाल तर तुम्हीही व्हाल थक्क

थंडी म्हटलं की सर्दी, खोकला, ताप असे सामान्य आजार आलेच. शिवाय शरीराची दुखणी वर येतात. पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात आणि या सर्वांवर घरगुती रामबाण उपचार आहे तो ओवा. चला तर मग ओव्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात

  • Share this:

आईSSSगं पोटात खूप दुखतंय... तुम्ही असं ओरडताच तुमची आई ओवा आणि गरम पाणी घेऊन तुमच्याकडे धावत येते... आपल्या पोटात दुखू लागलं की आपली आई, आजी आपल्याला लगेच ओवा खायला देते. आपली पोटदुखी जर पचनसंबंधी असेल तर ओवा खाल्ल्यानंतर पोटदुखीची ही समस्या तात्काळ दूर होते. थंडीमध्ये ओवा खावा, अशी आपली आजी आपल्याला नेहमी सांगते. आजीचं हे म्हणणं खरं आहे बरं. कारण थंडीत ओवा खाण्याचे भरपूर फायदे आहेत. थंडी म्हटलं की सर्दी, खोकला, ताप असे सामान्य आजार आलेच. शिवाय शरीराची दुखणी वर येतात. पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात आणि या सर्वांवर घरगुती रामबाण उपचार आहे तो ओवा. चला तर मग ओव्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

 

थंडीत ताप येत असल्यास सकाळ-संध्याकाळ अशा २ वेळेस ओवा चावून खावा

थंडीमध्ये खोकला लागतो, अशावेळी विड्यामध्ये सर्व जिन्नस घालून त्यात 1 ग्रॅम ओवा  घालावा आणि झोपताना खावा

अजीर्ण झाल्यास, पोट फुगत असल्यास रोज रात्री झोपतवेळी चिमूटभर ओवा चावून खावा

4 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम सैंधव एकत्र वाटून खावा, यामुळे पोट दुखणं थांबतं

वारंवार लघवीला होत असेल तर 2 ग्रॅम ओवा आणि 2 ग्रॅम गुळाच्या 4 गोळ्या कराव्यात आणि दिवसभरात खाव्यात

लघवी होत नसेल तर 4 ग्रॅम ओवा, 4 ग्रॅम गुळाच्या 9 गोळ्या कराव्यात आणि दिवसभरात खाव्यात.

शौचाला होत नसल्यास रात्री झोपताना 2 ग्रॅम ओवा चावून खावा

जेवल्यानंतर छाती-पोटात जळजळ होत असल्यास 1 ग्रॅम ओवा1 १ बदाम कतिंवा सुक्या खोबऱ्याचा 1 ग्रॅम तुकडा जेवणानंतर खावा

भूक लागत नसल्यास दररोज सकाळी ओवा चावून खावा

लहान मुलांना जंताची समस्या जास्त होते, त्यांना ओवा खाण्यास द्यावा

दूध पचन नसल्यास दूध प्यायल्यानंतर थोडा ओवा खावा

जास्त ढेकर येत असल्यास ओवा खावा

शरीरावर कुठेही दुखत असेल किंवा जखम झाली असेल तर ओवा पाण्यात वाटून गरम त्या भागावर लावावा

सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

अन्य बातम्या

थंडीत ठणठणीत राहायचंय...मग फक्त चहात नव्हे, तर असंही वापरा आलं

रंगरूप, चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम... फायदे जाणाल तर दररोज खाल हे फळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 10:39 PM IST

ताज्या बातम्या