भूक लागत नाही, झोप येत नाही, मग नियमित खा ‘ही’ भाजी

भूक लागत नाही, झोप येत नाही, मग नियमित खा ‘ही’ भाजी

झोप आणि भूकेची समस्या असल्यास त्यावर वांगं फायदेशीर आहे. वांगे हे निद्राकारा म्हणजे झोप आणणारे आहे. शिवाय अग्निदीपक असल्याने अन्न पचतं आणि भूक चांगली लागते.

  • Share this:

भरलं वांगे, वांग्याची भरीत म्हटलं की तोंडाला पाणीच सुटतं. असं चमचमीत वांगे समोर दिसताच त्यावर आपण तुटून पडतो. असं चविष्ट लागणारं हे वांगे आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. अनेकांना भूक लागत नाही, झोप येत नाही अशा लोकांनी तर वांग्याचं सेवन करावे. याशिवायदेखील वांग्याचे अनेक फायदे आहेत कोणते ते जाणून घेऊयात.

वांग्याचे आरोग्यदायी फायदे

वांगे हे अग्निदीपक आहे. त्यामुळे अन्न पचतं आणि भूक चांगली लागते.कोवळे डोरली वांगे विस्तवावर भाजून घ्यावं. जळलेली साल काढून टाकून द्या. आता वांग्यात मिरपूड आणि चवीपुरते सैंधव घालून खा.

पोट फुगून हृदयावर दाब पडतो आहे, असं वाटत असल्यासदेखील वरीलप्रमाणे वांगं खाणं फायदेशीर आहे. पोटफुगी कमी होऊन हृदयावरील दाब कमी होतो.

वांगे हे निद्राकाराम्हणजे झोप आणणारे आहे.वरीलप्रमाणे वांग्याचे भरीत खाऊन झोपल्यास झोप चांगली लागते. शिवाय वांग्याची पानंही झोपेसाठी उपयुक्त आहेत.वांग्याची पाने ठेचून त्याचा चमचाभर रस (१० ग्रॅम) घेऊन त्यात वाटीभर दूध (५० ग्रॅम) आणि खडीसाखर टाकून प्या. झोप चांगली लागेल.

अशक्तपणा वाटत असल्यास कोवळ्या वांग्याची भाजी खावी. वांगे शुक्रकर आहे. तेव्हा नियमित खाल्ल्यास थोड्याच दिवसात शक्ती वाढेल.

मूळव्याध असल्यास पांढऱ्या वांग्याची भाजी करून खावी किंवा गाठींवर वांगं भाजून लावावं.

कोवळं वांगं कफावरही फायदेशीर आहे, त्यामुळे कफ झाल्यास त्याची भाजी खावी.

ताप आल्यास वांग्याचं भरीत आणि मऊ भात खावा, ताप कमी होण्यास मदत होते.

तोंडाला चव नसेल तर वांगं वाफवून त्यात सैंधव आणि आलं घालून भाजी करावी.

सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

अन्य बातम्या

रंगरूप, चवीप्रमाणे आरोग्यासाठीही उत्तम... फायदे जाणाल तर दररोज खाल हे फळ

तुमची आजी म्हणतेय खरं... थंडीत ओवा खा बरं... फायदे जाणाल तर तुम्हीही व्हाल थक्क

First published: January 26, 2020, 8:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading