मुंबई, 24 डिसेंबर : दूध (Milk) पिणं जवळजवळ प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात लवंग आरोग्यासाठी उपयुक्त आहे. हे दोन पदार्थ एकत्र मिसळून म्हणजे दुधात लवंग घालून प्यायल्यास आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. लवंग-दूध आरोग्यासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं, ते पाहुया. तसंच लवंग-दूध कसं तयार करायचं, याचीही (Clove Milk Benefits) माहिती घेऊ.
हे पोषक घटक दूध आणि लवंगेत असतात
दूध आणि लवंगा या दोन्हींमध्ये भरपूर पोषक घटक असतात. दुधामध्ये प्रथिनं, कॅल्शियम आणि रायबोफ्लेविन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, खनिजे, चरबी, ऊर्जा, ए, डी, के आणि ई जीवनसत्त्वं यांसह अनेक पोषक घटक असतात. तर, लवंगेमध्ये प्रथिनं, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक आणि तांबं यांसारख्या आरोग्यास उपयुक्त घटक असतात.
अशा प्रकारे तयार करा लवंग-दूध
लवंग-दूध तयार करण्यासाठी सर्वप्रथम दूध चांगलं गरम करावं. यानंतर लवंग बारीक करून त्याची पूड बनवा. नंतर एक ग्लास दुधात लवंग पावडर मिसळून त्यात चवीनुसार गूळ किंवा साखर घालून सेवन करा.
हे वाचा - Symptoms of Teething: बाळाला दात येत असताना दिसतात ही लक्षणं; अशी घ्या त्याची काळजी
या वेळेस करा लवंग-दुधाचं सेवन
तसं पाहिलं तर, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही लवंग-दूध घेऊ शकता. पण हे दूध पिण्याची उत्तम वेळ म्हणजे रात्री. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लवंग-दुधाचं सेवन केलंत तर, ते तुमच्यासाठी सर्वांत चांगलं राहील. यामुळं तुमचा थकवा आणि मानसिक ताण बर्याच प्रमाणात कमी होईल.
हे वाचा - Weight Loss Tea: दालचिनीसोबत घरातीलच या गोष्टी घालून बनवा स्पेशल चहा; झपाट्यानं वजन होईल कमी
लवंग-दूध पिण्याचे फायदे
लवंग-दूध प्यायल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.
लवंग-दूध तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासही मदत करतं. तसंच, याच्यामुळं दातदुखी दूर होते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येत लवंग-दूध प्यायल्यानं खूप फायदा होतो.
भूक वाढवण्यासाठी लवंग-दूध खूप उपयुक्त ठरू शकते.
घसा खवखवणं, खोकला, घसा दुखणं यांसारख्या समस्या दूर करण्यासाठीही लवंग-दूध खूप फायदेशीर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle