सकाळी कामाला जाताना वापरा 'या' ब्युटी टिप्स

चेहऱ्याचं सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या त्वचेला पुरेस पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रात्रीच त्वचेला मॉश्चराईज करा. त्याने सकाळी त्वचा अगदी खुलून येईल.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2017 06:08 PM IST

सकाळी कामाला जाताना वापरा 'या' ब्युटी टिप्स

30 नोव्हेंबर : सकाळी कामाला जाणं सगळ्यांना आवडतंच असं नाही ! कारण सकाळी सगळी महत्त्वाची घरातली कामं करून मग ऑफिसला जाण्याची तयारी करावी लागते. आता कामाला जायचं म्हणजे नीटनेटकेपणा महत्त्वाचा, त्यात तयार व्हायला सकाळी वेळही कमी असतो. या सगळ्यात स्वत:ला खास ठेवण्यासाठी काही खास टिप्स.

काही खास ब्युटी टिप्स

- चेहऱ्याचं सौंदर्य जपायचं असेल तर आपल्या त्वचेला पुरेसं पोषण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी रात्रीच त्वचेला मॉश्चराईज करा.

त्याने सकाळी त्वचा अगदी खुलून येईल.

- रात्री कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी टाकून ते फ्रिजमध्ये ठेवा. आणि सकाळी चेहरा धुतल्यावर 5 मिनिटांनी चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहऱ्याचा मेकअप केला तरी चालेल.

Loading...

- रात्री झोपताना पाच चमचे दुधात थोडंसं लिंबू पिळा. 20 मिनिटानंतर त्याला चेहऱ्याला लावा आणि झोपा. सकाळी चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्याच्या कोमलतेबरोबरच चेहऱ्यावर तेज येतं.

- रोजचं एक फिक्स मेकअप रुटीन ठेवा. मेकअपच्या सगळ्या पद्धती तुम्हाला माहित असतील तर हे लक्षात असू द्या. रोजच्या दिवसात हे खूप उपयोगी आहे, त्याने घाईच्या दिवशी तुमची गडबड होत नाही.

- प्रवासाने आपले केस खूप खराब होतात पण सकाळच्या कामांमुळे केस धुवायला पुरेसा वेळ मिळत नाही. मग अशा वेळी रात्रीच केस धुऊन घ्या. यामुळे सकाळपर्यंत केस सुकतात आणि चांगले सेटही होतात.

- सकाळी कामाची खूप गडबड आणि कधी कधी तर आयत्या वेळेला कामाचा ताण वाढतो त्यात आणखी उशीर होण्यापेक्षा आपल्या मेकअपला साजेसा असा ड्रेस रात्रीच काढून ठेवा. त्याने सकाळी धावपळ होणार नाही.

- या सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुमचा आहार. तुम्ही दिवसभर पौष्टिक जेवण करा. याने आपोआपच त्वचा उजळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 06:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...