Home /News /lifestyle /

नवीन धावायला सुरुवात करणाऱ्यांसाठी या टिप्स आहेत महत्त्वाच्या; प्लॅनिंग सक्सेस होणारच

नवीन धावायला सुरुवात करणाऱ्यांसाठी या टिप्स आहेत महत्त्वाच्या; प्लॅनिंग सक्सेस होणारच

5. फिरायला जा
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला जा. चालण्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.

5. फिरायला जा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला जा. चालण्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.

स्वत:ला तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवण्यासाठी आपण धावायला जायला सुरुवात करत असाल किंवा धावायला जात असाल तर या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम लवकरात-लवकर दिसू लागतील.

    मुंबई, 17 जून : निरोगी राहण्यासाठी धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. आपल्याला जिममध्ये जाऊन व्यायाम करायला जमत नसेल तर दररोज किमान 15-20 मिनिटे नक्कीच धावा. धावण्याने शरीरातील अतिरिक्त चरबी आणि कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्याचाही हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र, बरेच लोक धावताना काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्या येऊ लागतात. स्नायू दुखू शकतात, पेटके येऊ शकतात, हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात, घोट्याला मोच येऊ शकते, डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी जर तुम्ही पहिल्यांदाच धावायला सुरुवात करत असाल तर येथे दिलेल्या काही टिप्स नक्कीच फॉलो करा, तरच धावण्याचा फायदा (Running tips for Beginners) होईल. नवीन धावायला सुरुवात करणाऱ्यांसाठी टिप्स - आरामदायक शूज - VeryWellfit.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, जर आपण पहिल्यांदाच धावायला सुरुवात करत असाल आणि स्वत:ला तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवायचे असेल, तर सर्वप्रथम आरामदायी बूट खरेदी करा. रनिंग शूज असे असावेत, जे तुम्हाला चांगले बसतील, धावायला त्रास होणार नाही. शूज खूप घट्ट किंवा खूप सैल नसावेत. बूट व्यवस्थित फिट बसणारे असल्यास दुखापत होण्याचा धोका नसतो. शूज सोबत, रनिंग शॉर्ट्स, टॉप्स, टाइट्स (अंडरवेअर) देखील खरेदी करा, ते देखील हलके आणि आरामदायक असावेत. वर्कआउट दरम्यान कोरडे राहण्यासाठी आरामदायक कपडे घालणे खूप महत्त्वाचे आहे. आधी वार्म-अप करा - अचानक धावायला सुरुवात करू नका. प्रथम आपण वार्म-अप करून शरीर गरम करून घ्या. सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे चाला किंवा सहज जॉगिंग करा. नंतर तुमच्या शारीरिक वेग आणि ताकद वाढवत जा. वॉर्म अप व्यायामामध्ये तुम्ही स्ट्रेचिंग किंवा रनिंग ड्रिल करू शकता. धावत असताना मध्येच चाला - नवीनच धावायला सुरुवात करत असाल तर मध्ये ब्रेक घेऊ शकता किंवा धावण्याच्या दरम्यान चालू शकता. जे प्रथमच धावत आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत खूप चांगली आहे. यामुळे सांध्यांवर जास्त आणि अचानक ताण येत नाही. गुडघे आणि सांध्याची ताकदही वाढते. धावताना, एक मिनिट धावा आणि नंतर एक मिनिट चाला. नंतर धावण्याची वेळ वाढवत जा. जसजसे तुम्हाला कम्पर्टेबल वाटू लागते तसतसे चालण्याची वेळ कमी करा. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर शरीराच्या स्थितीची काळजी घ्या - धावताना शरीराची स्थिती लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. तुमचा बॉडी पोस्चर सरळ ठेवा. आपली छाती ताट ठेवा, आपले डोळे समोर 10 ते 20 फूट अंतरावर जमिनीवर केंद्रित ठेवा. डोके फार वाकलेले नसावे. सुरुवातीला जास्त धावणे टाळा. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा हायड्रेटेड रहा - धावताना शरीरातून भरपूर घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. बाहेरचे हवामान थंड असो वा गरम, तुम्ही धावण्यापूर्वी, धावताना आणि धावल्यानंतर पाणी प्यावे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा पाणी प्या. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या