केळीच्या सालीचे 'हे' 10 गुणधर्म वाचून व्हाल चकित

केळीच्या सालीचे 'हे' 10 गुणधर्म वाचून व्हाल चकित

अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी उत्तम असतात

  • Share this:

मुंबई, 22 जून : केळ्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने आरोग्यासाठी केळी उत्तम असतात. उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरसुद्धा रुग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात. फार कमी लोकांना माहीत असेल की, केळीप्रमाणे केळीची सालीलाही तेवढंच महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला केळीच्या सालीचे गुणधर्म सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

1 - चेहऱ्याची त्वचा आणि केसांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी केळीची साल उपयुक्त असते.

2 - केळीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं. त्यामुळे आरोग्यासाठी साल उपयुक्त ठरते.

3 -  केळीची साल हलक्या हाताने चेहऱ्यावर घासल्याने चेहरा तुकतुकीत होतो.

4 -  केळीची साल आतल्या बाजूने त्वचेवर घासल्यास सुरकुत्या पडत नाहीत.

5 - केळीची साल काही मिनिटे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.

6 - एखाद्या लहान किडा चावल्यास त्या भागावर केळ्याची साल ठेवावी, दाह किंवा जळजळ लगेच कमी होते.

केळं 'या' वेळेलाच खावं, नाहीतर होईल आरोग्याचं नुकसान

7 - रात्री झोपताना केळीची साल बँडेजप्रमाणे मसवर बांधल्यास काही दिवसात मस निघून जातं.

8 - केळीच्या सालीवर मोहरीचे तेल टाकून वेदना होत असलेल्या जागेवर घासा, वेदना त्वरित थांबतात.

9 - केळीची साल दातांवर घासल्याने दात स्वच्छ आणि चमकदार होतात.

10 - सोरायसिसवरसुद्धा केळीची साल गुणकारी आहे. केळीची साल कुचकरून त्या भागावर लावल्याने सोरायसिसमुळे पडलेले डाग निघून जातात आणि आराम मिळतो.

आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा 'या' 6 गोष्टी

First published: June 22, 2019, 7:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading