मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कानात शिटी वाजल्यासारखा आवाज येतो? डोकेदुखीची समस्या वाढली?, मग हे आहे त्यामागचं मुख्य कारण

कानात शिटी वाजल्यासारखा आवाज येतो? डोकेदुखीची समस्या वाढली?, मग हे आहे त्यामागचं मुख्य कारण

सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि नर्व्ह रिलेटेड हेअर लॉस या समस्या त्यांना जाणवू लागल्या होत्या. इअर बॅलन्सिंग सिस्टीमवरही याचा भयानक विपरीत परिणाम झाला असल्याचं लक्षात आलं.

सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि नर्व्ह रिलेटेड हेअर लॉस या समस्या त्यांना जाणवू लागल्या होत्या. इअर बॅलन्सिंग सिस्टीमवरही याचा भयानक विपरीत परिणाम झाला असल्याचं लक्षात आलं.

सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि नर्व्ह रिलेटेड हेअर लॉस या समस्या त्यांना जाणवू लागल्या होत्या. इअर बॅलन्सिंग सिस्टीमवरही याचा भयानक विपरीत परिणाम झाला असल्याचं लक्षात आलं.

नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर: केस 1 : काही महिन्यांपूर्वी ग्रेटर नोएडामधल्या हिमालय प्राइड सोसायटीत राहणाऱ्या महेंद्र शुक्ला यांना अचानक असं वाटू लागतं, की त्यांच्या कानात शिटी वाजतेय. काही दिवसांनंतर त्यांना डोकं जड जड (Dizziness) वाटू लागलं आणि डोकेदुखीही होऊ लागली. त्यांनी डोकेदुखीवरची (Headache) औषधं घेतली, पण दिलासा मिळाला नाही. उलट झोप न येण्याची, ब्लड प्रेशर वाढण्याची आणि जीव घाबराघुबरा होण्याची समस्याही उद्भवली. महेंद्र शुक्ल यांनी फिजिशियनपासून न्यूरॉलॉजिस्टपर्यंत सर्वांच्या भेटी घेतल्या, त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केले; पण त्यांना आराम तर पडला नाहीच, शिवाय समस्या वाढतच गेल्या.

केस 2 : ग्रेटर नोएडामधल्या हिमालय प्राइड सोसायटीतच राहणारे अवधेश तिवारी यांना काम करता करता अचानक चक्कर येण्याची समस्या सुरू झाली. आराम केला, तर चक्कर येणं थांबतं; पण ते तात्पुरतंच. थोड्या वेळाने ते उठून बसले आणि चालू लागले, की समस्या पुन्हा उद्भवते. ही समस्या सातत्याने वाढत जाऊ लागली. त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं, की ही समस्या मेंदूशी संबंधित एखाद्या आजारामुळे उद्भवली असावी. म्हणून त्यांनी न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घेतला.

हेही वाचा- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आळूची पानं आहेत गुणकारी; त्यांचा आहारात असा करा उपयोग

वर उल्लेख केलेल्या या दोन्ही केसेसमध्ये रुग्णांना ईएनटी स्पेशालिस्ट (ENT Specialist) अर्थात कान, नाक, घसा तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला देण्यात आला. त्या तज्ज्ञांनी तपासल्यावर या दोन्ही रुग्णांच्या समस्येचं नेमकं निदान झालं. हे दोन्ही रुग्ण सातत्याने हेडफोन्स वापरत होते. त्यामुळे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि नर्व्ह रिलेटेड हेअर लॉस या समस्या त्यांना जाणवू लागल्या होत्या. इअर बॅलन्सिंग सिस्टीमवरही याचा भयानक विपरीत परिणाम झाला असल्याचं लक्षात आलं. यामुळे त्या दोघांनाही सातत्याने वेगवेगळ्या समस्यांना जाणवत होत्या.

इथे उल्लेख केलेली उदाहरणं प्रातिनिधिक आहेत. अशा समस्या कित्येक जणांना जाणवत आहेत. किती तरी रुग्ण या समस्यांच्या तक्रारी घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहेत. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. सुरेश सिंह नरुका सांगतात, की खासकरून लॉकडाउननंतर या प्रकारच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लॉकडाउन काळात बहुतांश नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी हेडफोन्स बराच वेळ वापरले. त्याचे साइड इफेक्ट्स आता जाणवू लागले असून, त्यांचं गंभीर समस्यांमध्ये रूपांतर झालं आहे.

हेही वाचा- Dengue झाल्यास पपईच्या पानांचा रस ठरेल फायदेशीर; आरोग्यासाठी आहेत याचे जबरदस्त फायदे

अनेक तरुण हेडफोन्स वापरतातच; शिवाय तरुणांमध्ये हेडफोन्सचा (Use of Headphones) आवाज खूप मोठा ठेवण्याची सवयही मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे न्यूरल हिअरिंग लॉस (Neural Hearing Loss) आणि नर्व्ह रिलेटेड हेअर लॉस (Nerve Related Hair Loss) या समस्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं पाहायला मिळतं आहे. पूर्वी अशा तक्रारी प्रौढ किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये जाणवायच्या. हेडफोन्स आणि ब्लूटूथच्या प्रचंड वापरामुळे आता तरुण पिढीही या समस्यांच्या तावडीत अडकली आहे. सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस या समस्येत सुरुवातीला डोकेदुखी, डोकं जड वाटणं आणि कानात आवाज येणं (टिनिटस) या समस्या रुग्णांना जाणवत आहेत.

डॉ. सुरेश सिंह नरुका सांगतात, की आपले कान दोन पद्धतींनी काम करतात. कानांचं पहिलं काम ऐकण्याचं आहे, तर दुसरं काम डोळे आणि मेंदू यांच्यासह संतुलन राखण्याचं. कोणत्याही कारणाने यांपैकी एकातही अडथळा निर्माण झाला, तर दुसऱ्या गोष्टीवर आपोआपच दुष्परिणाम होतो. त्यामुळे कोणाला ऐकू न येण्याची समस्या निर्माण झाली, तर शरीराचा तोल सावरण्यातही काही अडचणी येऊ शकतात. बहिरेपणा येणं, कानात शिटी वाजल्यासारखा आवाज येणं, चक्कर येणं अशा प्रकारची प्राथमिक लक्षणं दिसू शकतात.

हेही वाचा- उपवास करूनही ठणठणीत राहाल; Navratri मध्ये फक्त हे पदार्थ खा

 डॉ. सुरेश सिंह नरुका सांगतात, की कानात शिटी वाजल्यासारखा आवाज येणं आणि चक्कर येणं हे हेडफोनच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम सुरुवातीला दिसतात. ते संकेत लक्षात घेऊनही हेडफोन्सचा वापर सुरूच राहिला, तर समस्या गंभीर रूप धारण करू शकतात. प्राथमिक लक्षणांनंतर काही दिवसांनी डोकेदुखी, झोप न येणं अशा समस्या सुरू होतात. त्यातून सायको सोशल इश्यूज सुरू होतात. आणि त्यातूनच डिप्रेशन (Depression) आणि जीव घाबराघुबरा होण्यासारख्या समस्या दिसू लागतात. त्यानंतर उपचार न झाल्यास सायको सोशल डिटॅचमेंट सुरू होऊ शकते.

हेडफोन्स किती वेळ वापरतो, यापेक्षाही त्याचा आवाज आपण किती ठेवतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं डॉ. सुरेश सिंह नरुका म्हणतात. हेडफोन्सवर 10 ते 15 डेसिबल तीव्रतेच्या आवाजात सौम्य संगीत (Soft Music) ऐकत असाल, तर कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होत नाही; पण 80-90 डेसिबल तीव्रतेच्या आवाजात हेडफोन्सवर गाणी ऐकली, तर पाच मिनिटांतही बहिरेपणा येऊ शकतो. अनेक जणांना हेडफोन्समध्ये मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची सवय असते. त्यामुळेच वर उल्लेख केलेल्या समस्या सर्वांना जाणवत आहेत. काही जण तर कायमचेच बहिरे होण्याचा धोकाही आहे.

First published:
top videos

    Tags: Health