रडल्यानंतर तुमचेही डोळे जड होतात, डोकं दुखतं, असं का? यामागे आहेत 'ही' कारणं

रडल्यानंतर तुमचेही डोळे जड होतात, डोकं दुखतं, असं का? यामागे आहेत 'ही' कारणं

रडणं (Crying) ही आपला भावना व्यक्त करण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र रडल्यानंतर अनेकांना डोकेदुखीची (headache) समस्या बळावते.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : रडल्यानंतर डोळे जड वाटतात, डोकं दुखू लागतं, शरीरदेखील जड झाल्यासारखं वाटतं. हे फक्त तुमच्यासोबतच नाही, तर अनेकांसोबत होतं. ही डोकेदुखी दूर करण्यासाठी आपण कित्येक उपाय करतो. औषधं घेतो, थोडा आराम करतो. मात्र रडल्यानंतर असं काहोतं, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

रडणं हे आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे, जो पूर्णपणे नैसर्गिक आहे. रडल्यानंतर डोळे जड वाटतात आणि सूजतात. त्यानंतर डोकं दुखू लागतं. यामागे नेमकं काय कारण आहे, जाणून घेऊयात.

स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात

तज्ज्ञांच्या मते, रडताना आपल्या शरीरात असे काही हार्मोन्स रिलीज होतात, ज्यामुळे डोकं जड झाल्यासारखं वाटतं. रडताना आपल्या मेंदूतील न्यूरोट्रान्समिटर्स अक्टिव्ह होता, ज्यामुळे डोकं दुखू लागतं. जेव्हा तुम्ही आनंदामध्ये रडता, तेव्हा क्वचितच डोकं दुखू लागतं, मात्र जेव्हा दुखात रडता तेव्हा डोकं तीव्र दुखू लागतं.

हेदेखील वाचा - Cooking oil चा तुमच्या आरोग्यावर होतो परिणाम, तुम्ही योग्य तेल वापरताय ना?

तणाव

काही लोकं त्यांच्या आयुष्यात असलेल्या समस्यांमुळे रडतात, अशावेळी त्यांच्या डोकेदुखीचं कारण तणाव असू शकतं. रडल्याने मेंदूतील मांसपेशींवर ताण येतो, ज्यामुळे खांदे आणि डोकं दुखू लागतं.

मायग्रेन

ज्यांना मायग्रेनची समस्या असते, त्यांना रडल्यानंतर तीव्र डोकेदुखी होते. मायग्रेन ही अशी समस्या आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त वेळ डोकं दुखतं. शिवाय उलटीदेखील येते.

 सायनस

मायग्रेनप्रमाणे सायनसची समस्या असलेल्यांनाही रडल्यानंतर डोकेदुखी जाणवते. डोळ्यातून जेव्हा अश्रू निघतात तेव्हा डोक्यावर त्याचा ताण येतो आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशावेळी शक्यतो आराम करण्याची गरज असते.

सूचना – या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी देत नाही. तज्ज्ञांशी संपर्क जरूर करावा.

हेदेखील वाचारात्री चुकूनही पिऊ नका Green tea, आरोग्याला पोहोचेल हानी; जाणा योग्य वेळ कोणती?

First published: February 28, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading