Home /News /lifestyle /

पांढऱ्या केसांचा त्रास होतोय? मग करा 'हा' घरगुती उपाय

पांढऱ्या केसांचा त्रास होतोय? मग करा 'हा' घरगुती उपाय

पांढरे केस कमी करण्यासाठी (Remedy to reduce white hair )काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे कांद्याचे तेल (Onion oil). कांद्याच्या तेलामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.

    नवी दिल्ली, 22 जून : आपले केस निरोगी (Healthy Hair) आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे आपण वेगवेगळे प्रोडक्ट लावून त्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र केमिकलयुक्त गोष्टी वापरल्यानं त्याचा केसांवर (Hair Tips) गंभीर परिणाम होत असलेला पहायला मिळतो. यामुळे आपले केस कोरडे आणि पांढरे होऊ लागतात. त्याचबरोबर ताण-तणाव यामुळे केसांची गळती (Hair Fall)देखील होते. खास करुन महिलांना आपल्या केसांची जास्त काळजी असल्यामुळे त्यांना आपले केस काळे घणदाट असावे, नेहमी वाटतं. अशातच हे पांढरे केस कमी करण्यासाठी (Remedy to reduce white hair )काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. यातील महत्त्वाचा उपाय म्हणजे कांद्याचे तेल (Onion oil). कांद्याच्या तेलामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. या तेलांमुळे खालीलप्रमाणे फायदे होतात. हेही वाचा -  तुमचं शरीर सांगतं तुमच्या स्वभावाबद्दल; जाणून घ्या काय म्हणतं शास्र केस पांढरे होण्यापासून मदत -  कांद्याच्या तेलामध्ये आढळणारे सल्फर केसांसाठी खूप फायदेशीर असते. यामुळे केस गळण्यापासून ते फुटण्यापर्यंत आराम मिळतो. याशिवाय, ते केसांचा नैसर्गिक pH राखून ठेवते आणि केस दाट बनवण्याचे काम करते. हे तेल नियमित लावल्यानं केस चांगले होतात. हेही वाचा -  Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे केस गळण्यावर नियंत्रण -  कांद्याच्या तेलामुळे केस गळतीवर नियंत्रण मिळते. तेलात असलेले  अँटी ऑक्सिडंट केस गळती रोखणारे एन्झाइम सक्रिय करतात, त्यामुळे याचा वापर केल्यास फायदा होतो. तसेच, यामध्ये असलेले सल्फर टाळूला निरोगी बनवते. रक्तभिसरण सुधारते -   रक्तभिसरण व्यवस्थित होत असेल तर केसांची वाढही व्यवस्थित होते. कांद्याच्या तेलामुळे रक्तभसरण प्रक्रिया सुधारते. त्यामुळे कांद्याचे तेल नियमित लावले तर रक्तभिरसण व्यवस्थित होऊन केसांची वाढही व्यवस्थित होण्यास मदत होईल.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Home remedies, Lifestyle, Woman hair

    पुढील बातम्या