तुम्ही रिकाम्या पोटी कॉफी घेता का? होऊ शकतात गंभीर परिणाम

तुम्ही रिकाम्या पोटी कॉफी घेता का? होऊ शकतात गंभीर परिणाम

रिकाम्या पोटी कॉफी पिणे शरीराकरीता हानिकारक आहे, जाणून घ्या काय आहेत त्याचे परिणाम.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : चहाला कोणी ट्क्कर देणारं असेल तर ती आहे कॉफी. जितके चहाप्रेमी आपल्या आजूबाजूला असतील तेवढेच कॉफीलवरही आढळतील. काहींची दिवसाची सुरुवात कॉफीने होते. याशिवाय ऑफीसमध्ये, परीक्षेच्या ताणात तर काही जण कॉफीडेटवर ही जातात. एकूणच कॉफीदेखील अनेकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे.उत्तेजक पेय म्हणून जगभरात कॉफीचं सेवन केलं जातं. कॉफी प्यायल्याने झोप उडते, फ्रेश वाटतं, एनर्जी लेव्हल वाढते आणि अकाग्रताही वाढते. डोकेदुखी, नैराश्य या समस्या दूर करण्यासाठी कॉफी पिणं योग्य असलं तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शरीरासाठी हानिकारक ठरतो. अमेरिकेमध्ये जवळपास 63 टक्के लोक रोज कॉफी घेतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेतच पण, ती कधी घ्यावी याचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. रिकाम्या पोटी कॉफी पिणे शरीराकरीता हानिकारक आहे, जाणून घ्या काय आहेत त्याचे परिणाम.

'या' कारणामुळे भारतीय युवकांमध्ये धूम्रपान करण्याचं प्रमाण सर्वाधिक

 रिडर्स डायजेस्ट या मॅगजीनमध्ये आलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही सकाळी नात्याच्या आधीच कॉफी घेत असाल तर ते शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. ते शरीरातील कोर्टीसोलचं प्रमाण वाढवतं. कोर्टीसोल तुमच्यातील प्रतिकार शक्ती, चयपचन आणि ताण प्रतिसादाला याचं नियंत्रण करत. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यानं तणावात आणखी वाढतो.

एका अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे की, काही खाल्लं नसताना म्हणजे पोट रिकामं असताना कॉफी पिण्याऱ्या लोकांमध्ये मूड स्विंगची तक्रार समोर येते. मूड स्विंग म्हणजे स्वभावात सतत बदलाव येणे, चिडचिडेपणा येणे. त्याशिवाय अपचन, अ‍ॅसिडीटी, हृदयासंबंधी समस्या, अल्सर सारख्या समस्यादेखील उद्भवतात. तर, मानसिक आरोग्यासाठी ही ते तितकेच हानिकारक आहे. दररोजच्या रिकाम्या पोटी कॉफी पिण्याच्या सवयीने चिंता, निराशा, काळजी किंवा पैनिक अटॅकसारख्या गंभीर समस्या होण्याची शक्यता असते. पोटासंबंधी समस्या म्हणजे अपचन, कब्ज अशा तक्रारीही वाढू शकतात.

VIRAL FACT : करडूच्या पायाला लावलं चाक, पळाला सुसाट!

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 26, 2019, 7:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading