बुटके जिराफ कधी पाहिलेत का? या दोन प्राण्यांमुळे शास्त्रज्ञ गोंधळले

बुटके जिराफ कधी पाहिलेत का? या दोन प्राण्यांमुळे शास्त्रज्ञ गोंधळले

प्राण्यांमध्ये सर्वांत उंच आणि लांबलचक मान यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिराफ या प्राण्यानं सध्या जगभरातील शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकलं आहे.

  • Share this:

कंपाला, 12 जानेवारी : प्राण्यांमध्ये सर्वांत उंच आणि लांबलचक मान यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिराफ या प्राण्यानं सध्या जगभरातील शास्त्रज्ञांना बुचकळ्यात टाकलं आहे. उत्तर युगांडातील (North Uganda)  मर्चीसन फॉल्स राष्ट्रीय उद्यानातील (Murchison National Park)  सवाना (Savana) चक्क दोन बुटके जिराफ (Dwarf Giraffe) आढळले असून, त्यांची उंची सरासरी 9 फूट आहे. या जिराफांची शारीरिक ठेवणही थोडी वेगळी आहे. यांची मान सर्वसाधारण जिराफांइतकीच लांब आहे, पण त्यांच्या पायांची उंची कमी आहे.

या दोन जिराफांपैकी एकाची उंची 9.4 फूट आहे तर एकाची उंची 9 फूट आहे. सर्वसाधारणपणे जिराफाची उंची 15 ते 20 फूट असते. या उंचीमुळे जिराफ झाडाची उंचावरची पानेही सहज खाऊ शकतात; पण या दोन जिराफांची उंची खूपच कमी असल्यानं त्यांना बुटके जिराफ (Dwarf Giraffe) म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. वन्यजीव संशोधकही हे बुटके जिराफ बघून आश्चर्यचकीत झाले आहेत. जिराफ संवर्धन फाउंडेशनचे (Giraffe Conservation Foundation) सहसंस्थापक ज्युलियन फेनेसनं शुक्रवारी रॉयटरला दिलेल्या माहितीनुसार, जिराफाबाबत संशोधन करणाऱ्या संशोधकांनी शोधलेले हे या बुटके जिराफ म्हणजे एका आश्चर्यकारक शोध आहे.

हे ही वाचा-प्रोसेस्ड फूडमुळे येऊ शकतो लवकर मृत्यू; आरोग्यावर होणारे घातक परिणाम आले समोर

स्केलेटल डिस्प्लेसिया आजाराची शिकार :  शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जिराफ बुटके आहेत, कारण त्यांना स्केलेटल डिस्प्लेसिया (Skeletal Dysplasia )आजार झाला आहे. जिराफांमध्ये हा आजार आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वसाधारण जिराफ 15 ते 20 फूट उंचीचे असतात. 2018 मध्ये जिराफ संवर्धन फाउंडेशनबरोबर काम करणाऱ्या संशोधकांनी नामिबियामध्ये 8.5 फूट उंचीच्या जिराफाचा शोध लावला होता. तीन वर्षांपूर्वी युगांडामधील वन्यजीव उद्यानात 9 फूट 3 इंच उंचीचा जिराफ आढळला होता. स्केलेटल डिस्प्लेसिया या आजारामुळं हाडांचा पूर्ण विकास होत नाही. वय वाढते मात्र उंची वाढत नाही. कमी उंचीमुळे जिराफांना चालण्या-फिरण्यात अडचणी येतात. गेल्या महिन्यात ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, या बुटक्या जिराफांमध्ये मान उंच असली तरी पाय लहान आणि वाकडे आहेत. स्केलटेल डिस्प्लेसिया आजार आतापर्यंत माणसांमध्ये आणि पाळीव प्राण्यांमध्ये आढळतो. आतापर्यंत जंगली जनावरांमध्ये हा आजार दुर्मीळ होता, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 12, 2021, 9:27 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading