मुंबई, 12 जुलै : पावसाळा म्हणजे आजार होण्याची भिती अधिक. अशात बाहेरचे पदार्थ खातानाही विशेष काळजी घ्यावी लागते. रोज लागणारे फळ आणि भाज्यांवरही इन्फेक्शनचा धोका असतोच. कारण, पानांच्या भाज्यांवर किडे किंवा अळ्या असण्याची शक्यता जास्त असते. टरबुज किंवा कलिंगड या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. हवामानात होणाऱ्या बदलामुळे त्यात बॅक्टेरिया होऊ शकतात. त्यामुळे ही फळं पावसाळ्यात खाणे टाळा. जाणून घ्या पावसाळ्यात कोणती फळे खावीत.
सावधान ! सॅनेटायझरचा अतिवापर केल्यानं होऊ शकतात ‘हे’ आजार
पेरू – हे फळ पावसाळ्यात होणाऱ्या पचनासंबंधीत रोगांना दुर ठेवून पचनप्रक्रियेला मदत करतं. यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पाचक रसांच्या स्त्रावाला वाढण्यास मदत होते. कब्ज, गैस, अपचन अशा पोटासंबंधीच्या समस्या कमी होतात. याशिवाय पेरुमध्ये जीवनसत्व ए आणि सी, लाइकोपीन, पोटॅशियम, मॅगनीज, आर्यन, कॅल्शियम असे पोष्टीक घटक आढळतात. ते रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
जांभूळ – पावसाळ्यात जांभळाचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, आर्यन आणि जीवनसत्व आढळतात. यामध्ये असणारे एंटीऑक्सीडंट त्वचेला तजेलदार करण्यास मदत करतात. याशिवाय जांभूळ रक्तशुद्धीचं कामही करतं. मधमेह असणाऱ्या लोकांसाठी जांभूळ अत्यंत फायदेशीर आहे.
निमयित एक सफरचंद खा, 'हे' गंभीर आजार दूर ठेवा
पीच – यामध्ये जीवनसत्व ए, बी, सी आणि एंटीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात आढळतात. हे फळ खाल्याने शरीर निरोगी राहण्यासोबत शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं. डोळ्यासाठी हे फळ चांगलं असत आणि यातील फायबरयुक्त घटक लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं.
Zomato डिलीव्हरी बॉयला रॉडने बेदम मारहाण, हॉटेल मालकाचा VIDEO व्हायरल