कितीही घाईत असाल तरी चुकवू नका नाश्ता; हे 5 पौष्टिक पदार्थ

कितीही घाईत असाल तरी चुकवू नका नाश्ता; हे 5 पौष्टिक पदार्थ

दिवसातल्या 3 वेळच्या मुख्य जेवणाव्यतीरीक्त 2-3 पोष्टीक स्नॅक्सची गरज असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही हे 5 पदार्थ खा आणि स्वतः ला फीट ठेवा.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : कामाच्या आणि खास करून ऑफीसच्या व्यापातून पौष्टिक खाण्याकडे लक्ष देणं शक्य होत नाही. मग साहजिकच आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यातच काय खायचं किंवा बाहेरच्या उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमधलं काय घ्यायचं हे मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं. दिवसभरात जेवणाव्यतिरिक्त खाण्यासाठी कोणते पौष्टिक परार्थ तुम्ही खाऊ शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आपल्या शरीराला आणि मेंदूला व्यवस्थित काम करण्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण सुसंगत असणं गरजेचं असतं. त्यामुळे दिवसातल्या 3 वेळच्या मुख्य जेवणाव्यतिरीक्त 2-3 पौष्टीक स्नॅक्सची गरज असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही हे 5 पदार्थ खा आणि स्वतः ला फिट ठेवा.

मफिन्स

तुम्ही घरच्या घरीच मफिन्स अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. तुकडे केलेल्या ड्रायफ्रुट्सचा आणि जवसासारख्या बियांचा वापर करून मफिन्स पौष्टिक होतात. तेलाऐवजी तुपाचा वापर करून साखरेतं प्रमाण नियंत्रित ठेवता येईल. बाजारातही वेगवेगळ्या प्रकारचे आणि पौष्टिक मफिन्स हल्ली उपलब्ध असतात. हे मफिन्स ऑफीसला जातानाआपल्याजवळ बाळगा.

सुकामेवा

ड्रायफ्रुट्सचं महत्त्व तर आपण जाणताच. ते पौष्टिक असण्यासोबतच दिवसभरात पटकन स्नॅक्स करण्यासाठी अतीशय चांगला पर्याय आहे. त्याने तुमचे वजनही वाढणार नाही आणि पोटाला आधारही मिळेल. एकाच प्रकारचं ड्रायफ्रुट खाण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या सुख्या मेवाचं मिश्रण करावं. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, मनुके यांना एकत्रित करावे आणि पाच किंवा सहा कामाच्या दिवसांची पाकिट तयार करावं.

हे ही वाचा : दिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच!

प्रोटिन बार

प्रोटिन बार म्हणजे एका प्रकारची चिक्की म्हणावी लागेल. त्यामधून एकाचवेळी भरपूर प्रमाणात प्रोटीन उपलब्ध होतात. त्यात असणारे वेगवेगळे घटक पोष्टीक असण्यासोबतच चवदारही असतात. त्याने पोटही भरते. बाजारात विविध कंपन्यांचे आणि वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. ऑफीसच्या वेळेत हे प्रोटिन बार खाल्याने तुमची भूकही मिटेल आणि वजनही वाढणार नाही.

भाजलेले शेंगदाणे किंवा चणे आणि गूळ

तव्यावर हलकेच भाजलेले शेंगदाणे किंवा चणे एका डब्यात भरून ठेवावेत. चिप्स, वेफर्स असे तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्यापेक्षा शेंगदाणे किंवा चणे खावेत. त्याबरोबर थोडा गूळ खाल्ला तर चवही वाढेल आणि आणखी हेल्दी स्नॅक्स ठरेल.

हे ही वाचा : थायरॉइड कमी करण्यासाठी करा ‘ही’ चार योगासनं !

मोड आलेली कडधान्यं

कडधान्य शरीराला किती उपयुक्त आहेत आपण जाणताच पण त्याचा फक्त जेवणामध्ये समावेश करण्यासोबतच इतर वेळीही ते खाता येऊ शकतात. मोड आलेली मटकी, मूग, मसूर यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन आणि प्रोटीन असतात. एक वाटी मोड आलेल्या कडधान्यांचं मिश्रण खाल्लं तर शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. त्याला चवदार करण्यासाठी टोमॅटो, कांदा, काकडी, सिमला मिरची आणि लिंबू याचा वापर करू शकता. हे स्प्राउट्स सॅलंड सगळ्यात हेल्दी आणि बेस्ट पर्याय आहे.

VIDEO: गुरूपौर्णिमेलाच शिक्षकाची गुंडगिरी, बंदुकीचा धाक दाखवून बस चालकाला धमकी

First published: July 17, 2019, 6:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading