मोठी बातमी! भारतात पहिल्यांदाच मंत्री घेणार CORONA VACCINE; मेड इन इंडिया लशीसाठी सज्ज

मोठी बातमी! भारतात पहिल्यांदाच मंत्री घेणार CORONA VACCINE; मेड इन इंडिया लशीसाठी सज्ज

कोरोना लशीसाठी (corona vaccine) प्रत्यक्षरित्या योगदान देणारे भारतातील हे पहिलेच मंत्री आहेत.

  • Share this:

रोहतक, 19 नोव्हेंबर :  मेड इन इंडिया कोरोना लस (Coronavirus vaccine) कोवॅक्सिन (Covaxin) क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंत सुरुवातीच्या दोन टप्प्यातील ट्रायलमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. मात्र आता पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये भारतातील मंत्रीही सहभागी होणार आहे. मेड इंडिया कोरोना लस घेण्यासाठी हरयाणाचे आरोग्यमंत्री सज्ज झाले आहेत.

हरयाणामध्ये 20 नोव्हेंबरपासून कोवॅक्सिन लशीचं ट्रायल सुरू होतं आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विजदेखील सहभागी होणार आहेत. आपण ही लस घेणार माहिती राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

सिव्हिल रुग्णालयात सकाळी 11 वाजता या लशीचं ट्रायल सुरू होणार आहे. पीजाआय रोहतक आणि आरोग्य विभागाच्या देखरेखीत आपण लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री विज यांनी सांगितलं.

हे वाचा - 'देशातील सर्व नागरिकांना Covid -19ची लस मोफत द्या'; नारायण मूर्तींनी सूचवला उपाय

भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी याआधी दिली होती.

हे वाचा - एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी तातडीनं मुंबईकडे रवाना

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार रजनी कांत म्हणाले, "लशीचा परिणाम चांगला दिसून आला आहे. प्राण्यांवरील चाचणी आणि माणसांवरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तशी ही लस सुरक्षित आहे मात्र तरी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होईलपर्यंत 100% हमी देऊ शकत नाही"

"पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच ही लस उपलब्ध होईल. गरज पडल्यास या लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचाही सरकार विचार करत आहे", असंही कांत यांनी सांगितलं.

हे वाचा - सलमान खानचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आला; भाईजानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी

असं झालं तर कोवॅक्सिन ही लाँच होणारी पहिली भारतीय कोरोना लस असेल. दरम्यान भारत बायोटेकनं यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.

Published by: Priya Lad
First published: November 19, 2020, 6:36 PM IST

ताज्या बातम्या