भाजपचे वरिष्ठ नेता आणि मंत्री अनिल विज यांनी अंबालातील सिव्हिल रुग्णालयात ही लस घेतली. पीजीआय रोहतक आणि आरोग्य विभागाच्या देखरेखीत ही लस त्यांना देण्यात आली. पीजीआय रोहतकच्या कुलगुरूंनी दिलेल्या माहतीनुसार, सर्वात आधी 200 वॉलंटियर्सना पहिला डोस दिला जात आहे. प्रत्येकाला दोन डोस दिले जातील. पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. हे वाचा - सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचवायची असेल तर हे करा - उद्योजिकेचा अभिनव उपाय भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी याआधी दिली होती. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार रजनी कांत म्हणाले, "लशीचा परिणाम चांगला दिसून आला आहे. प्राण्यांवरील चाचणी आणि माणसांवरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तशी ही लस सुरक्षित आहे मात्र तरी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होईलपर्यंत 100% हमी देऊ शकत नाही" हे वाचा - पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार "पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच ही लस उपलब्ध होईल. गरज पडल्यास या लशीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचाही सरकार विचार करत आहे", असंही कांत यांनी सांगितलं. असं झालं तर कोवॅक्सिन ही लाँच होणारी पहिली भारतीय कोरोना लस असेल. दरम्यान भारत बायोटेकनं यावर अद्याप काही प्रतिक्रिया दिली नाही आहे.#WATCH Haryana Health Minister Anil Vij being administered a trial dose of #Covaxin, at a hospital in Ambala.
He had offered to be the first volunteer for the third phase trial of Covaxin, which started in the state today. pic.twitter.com/xKuXWLeFAB — ANI (@ANI) November 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus