मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या चुकीच्या सवयीमुळे हृदय आणि शरीर होतं कमकुवत; अजूनही वेळ गेली नसेल तर बदला

या चुकीच्या सवयीमुळे हृदय आणि शरीर होतं कमकुवत; अजूनही वेळ गेली नसेल तर बदला

व्यायामाच्या अभावामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि पोषणाची कमतरता जाणवू शकते. यासह, व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह, तणाव, नैराश्य, शारीरिक वेदना इत्यादी समस्या देखील जाणवू शकतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : शरीर निरोगी ठेवणं फार महत्त्वाचं आहे, अन्यथा अनेक धोकादायक रोग कमी वयातही अडचणी निर्माण करतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांना व्यायाम (exercise) न करण्याची सवय आहे, त्यांचे हृदय आणि शरीर खूप कमकुवत होत जातं. धकाधकीच्या आणि व्यग्र जीवनात अनेक लोकांनी व्यायाम करणं पूर्णपणे बंद केलं आहे. ज्याचा परिणाम अनेक गंभीर आजारांच्या रूपात भोगावा लागू शकतो. व्यायाम न करण्याची सवय गंभीर (Harmful Habit for health) आजारांना कारणीभूत ठरू शकते.

व्यायाम न केल्याने कोणते आजार होऊ शकतात?

तज्ञांच्या मते, व्यायामाच्या अभावामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि पोषणाची कमतरता जाणवू शकते. यासह, व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह, तणाव, नैराश्य, शारीरिक वेदना इत्यादी समस्या देखील जाणवू शकतात. इतर शारीरिक समस्यांबद्दल जाणून घेऊया.

1. हृदयविकार

हृदय आपल्या शरीराच्या सर्व अवयवांना निरोगी रक्त पुरवण्याचे कार्य करते. जर त्याचे कार्य विस्कळीत झाले तर शरीरावर वाईट परिणाम होतो. NCBI च्या अहवालानुसार, जे लोक दररोज कार्डिओ किंवा एरोबिक व्यायाम (exercise) करतात, त्यांचे हृदय निरोगी असते आणि त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो.

हे वाचा - एकमेकींच्या झिंझ्या उपटून जमिनीवर आपटलं, भररस्त्यात आजीबाईंची जबरदस्त फायटिंग; VIDEO VIRAL

2. स्नायू कमजोरी

जेव्हा स्नायू कमकुवत होतात तेव्हा शारीरिक क्रिया करणे खूप कठीण होते. स्नायू मजबूत ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये लवचिकता आणि गतिशीलता असणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायाम न केल्याने स्नायूंची वाकण्याची क्षमता आणि लवचिकता कमी होत नाही तर त्यांच्याकडे येणारा रक्त प्रवाह देखील कमी होतो.

3. तग धरण्याची क्षमता

जे लोक व्यायाम करत नाहीत. त्यांच्या शरीरात तग धरण्याची क्षमता आणि सहनशक्ती कमी होते. ज्यामुळे दम लागणे, छोटी-मोठी कामे करताना थकवा येणे यासारख्या समस्या आहेत.

हे वाचा - स्वत: पतीनेच कम्प्युटर इंजिनिअर पत्नीचं नाव नोंदवलं वधू-वर सूचक मंडळात; खुलाशानंतर सासरचेही चक्रावले

4. निद्रानाश

व्यायाम न करण्याच्या सवयीचा तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीर स्वतःला तंदुरुस्त आणि रीफ्रेश करण्यात अक्षम होते. त्यामुळं तणाव आणि चिडचिड वाढू शकते. व्यायाम केल्याने शारीरीक थकवा जाणवतो आणि शरीर मनाला विश्रांतीचे संकेत मिळतो. ज्यामुळे तुम्हाला पटकन झोप येते.

सवयींमध्ये काय बदल करावा -

तज्ज्ञांच्या मते, व्यायामाचा अर्थ केवळ जिममध्ये जड वजन उचलणे नाही. त्याऐवजी, आपण दररोज 20-30 मिनिटे शारीरिक क्रिया करावी. ज्यात कमीतकमी जॉगिंग, चालणे, योग, खोल श्वास घेणे, स्ट्रेचिंग इत्यादी वेगवेगळे प्रकार असले पाहिजेत.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)

First published:

Tags: Health Tips, Heart Attack, Types of exercise