मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

New Year 2021 Rules : कुठल्या शहरांत काय आहे covid िनयमावली? पाहा आणि मगच पार्टी प्लॅन करा

New Year 2021 Rules : कुठल्या शहरांत काय आहे covid िनयमावली? पाहा आणि मगच पार्टी प्लॅन करा

कोरोनापासून (Covid-19) स्वत:चा बचाव करतच आपल्याला नव्या वर्षाचं स्वागत (new year celebration) करावं लागणार आहे. अशावेळी हे नियम विसरून चालणार नाही.

कोरोनापासून (Covid-19) स्वत:चा बचाव करतच आपल्याला नव्या वर्षाचं स्वागत (new year celebration) करावं लागणार आहे. अशावेळी हे नियम विसरून चालणार नाही.

कोरोनापासून (Covid-19) स्वत:चा बचाव करतच आपल्याला नव्या वर्षाचं स्वागत (new year celebration) करावं लागणार आहे. अशावेळी हे नियम विसरून चालणार नाही.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 डिसेंबर : मार्चपर्यंत सगळं स्थिरस्थावर असताना अचानक कोरोना (coronavirus) आला आणि त्यानं 2020 चं सगळं वर्षच खाऊन टाकलं. आता या वर्षातून सुखरूप बाहेर पडल्यावर सगळ्यांना आशा आहे, की येणारं 2021 सुरक्षित आणि आनंददायी असेल. सगळेच उत्साहात 2021 च्या स्वागताची (new year celebrations) तयारी करत आहेत.

मात्र कोरोनाच्या तावडीत सापडायचं नसेल तर शासनानं घालून दिलेले हे नियम (rules) वाचणं आणि पाळणं याला याला पर्याय नाही. हरेक शहरासाठी (city) वेगळे असलेले हे नियम नजरेखालून घातलेच पाहिजेत. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता इथले हे नियम

मुंबई

- मुंबईत यापूर्वीच 5 जानेवारी 2021 पर्यंत नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.

-  राज्य सरकारनं आवाहन केलं आहे, की दहा वर्ष वयाखालची मुलं आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांनी नवीन वर्षाच्या सायंकाळी घराबाहेर पडणं टाळावा.

- धार्मिक किंवा सांस्कृतिक रॅलीज काढण्याची परवानगी मिळणार नाही.

- जवळपास 35000 मुंबई पोलीस कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी होतेय की नाही यावर लक्ष ठेवण्यास रस्त्यावर तैनात असतील.

- कोविड - 19 संबंधीच्या नियमांचं उल्लंघन अजिबात चालणार नाही.

- नाईट कर्फ्यूबाबतच्या प्रतिबंधांनुसार पब्स आणि इतर हॉटेल्सना ३१ डिसेंबरच्या रात्री केवळ ११ वाजेपर्यंतच परवानगी असेल.

- मुंबईकरांना गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी अशा त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाता येईल. मात्र चारहून अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.

पुणे

पुण्यातही नव्या वर्षाची पार्टी रात्री 11 पर्यंतच करण्याची मुभा आहे. अर्थात हेसुद्धा कोरोनाबाबतचे सगळे नियम पाळूनच करावे लागेल. पुण्यातही नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. पुण्याच्या आसपासच्या पर्यटनस्थळांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. पण सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश तिथेही लागू आहेत हे ध्यानात ठेवा.

दिल्ली

दिल्लीत सार्वजनिक कार्यक्रम आणि टेरेस पार्टिजना परवानगी नाही. पोलिसांच्या परवानगीशिवाय इतरही कसला कार्यक्रम आयोजित करता येणार नाही

बंगळुरू

कोरोनाच्या नवीन प्रजातीचा भारतात शिरकाव झाल्याने बंगळुरू पोलिसांनी नव्या गाईडलाईन्स लागू गेल्यात.

चारहून अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही. डीजे, पार्वती, म्युझिकल नाईट्स यांना परवानगी नाही.

हैदराबाद

31 डिसेंबरच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 1 जानेवारीच्या रात्री 1 वाजेपर्यंतच कुठलेही नववर्षाचे कार्यक्रम आयोजित करता येतील असे पोलीस कमिशनर महेश भागवत यांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी सर्व हॉटेल्सला नियमांचे पालन करण्याबाबत सक्त आदेश दिले आहेत.

चेन्नई

चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोडवर असलेले रिसॉर्ट्स आणि ओल्ड महाबलीपूरम रोड इथं नवीन वर्षाचे कुठलेही इवेन्ट्स करता येणार नाहीत. नवीन वर्षाच्या पार्टीजवर कोविडसंबंधीचे सर्व नियम लागू असतील

कोलकाता

कोलकातामध्ये कोविड 19 ला रोखण्यासाठीचे नियम कडकपणे लागू केले आहेत. पोलिस त्यांची अंमलबजावणी करण्यास सज्ज आहेत.

First published:

Tags: Coronavirus, Covid19, Mumbai, New year