नवी दिल्ली, 31 डिसेंबर : नवीन वर्ष 2022 (Happy New Year 2022) आपल्या सर्वांच्या आयुष्याचं दार ठोठावत आहे. येणारं नवीन वर्ष पुन्हा एकदा नवीन स्वप्ने, नवीन आकांक्षा आणि स्वतःला दिलेली काही संकल्प घेऊन येईल. दरवर्षी 1 जानेवारीला आपण स्वतःला किती आश्वासने देतो? कधी ती आश्वासने पाळली जातात, तर कधी जीवनाच्या धकाधकीत ती आश्वासने अपूर्ण राहतात. या वेळी नवीन वर्षात दुसऱ्याला काही वचन द्या किंवा देऊ नका. पण, स्वत:ला एक वचन नक्की द्या. जीवनात स्वतःला निरोगी ठेवण्याचा संकल्प करा. शरीर तंदुरुस्त असेल तर मनही निरोगी राहील.
आजकाल लोकांची सर्वात मोठी समस्या त्यांच्या आरोग्याची आहे. काहीजण वाढत्या वजनामुळे तर काही पोटाच्या वाढत्या चरबीमुळे त्रस्त आहेत. नवीन वर्षात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर फिटनेसची काही उद्दिष्टे तयार करावी लागतील. या फिटनेस उद्दिष्टांद्वारे, केवळ निरोगी शरीरच नाही तर निरोगी मनासह परिपूर्ण शरीर देखील मिळेल. 2022 च्या फिटनेस उद्दिष्टांबद्दल आज आपण जाणून घेऊया.
लवकर उठेन आणि चालायला जाईन
नवीन वर्षात एक गोष्ट लक्षात ठेवा की, काहीही झालं तरी तुम्ही सकाळी लवकर उठून फिरायला, चालायला जाल. दररोज सकाळी किमान 15 मिनिटे चालण्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. सकाळी फक्त 15 मिनिटंही चालल्यानं हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या टाळता येतात.
व्यायाम करणारच
घराभोवती जीम नसल्याची सबब सांगून अनेकजण व्यायाम करणे टाळतात. मोकळ्या मैदानात, उद्यानात किंवा जिममध्येच व्यायाम केला जातो, असे अनेकांना वाटते, पण आता काळ बदलला आहे. लोक घरीच व्यायाम करू शकतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पुशअप्स, चेस्ट फ्लाय, चेस्ट स्किव्ह, बर्पी असे व्यायाम करू शकता. या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेचीही गरज नाही आणि आरोग्यही चांगले राहते.
योगासने करीन
रोज अर्धा तास योगा केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. असे म्हणतात की नियमित योगासने केल्याने शरीरातील थकवा दूर होतो.
पुरेसे पाणी पिणार
नवीन वर्षापासून आपण दररोज किमान 3 लिटर पाणी पिणारच याचा निश्चय करा. कारण, शरीरात पुरेसे पाणी असल्याने मन शांत राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते. अनेक आजार तुमच्यापासून दूर ठेवण्यासाठी पाणी गरजेचे आहे.
केटो आहार
जर तुम्ही यावर्षी वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही केटो डाएट फॉलो करू शकता. केटो आहारामुळे कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी होते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी करणे सोपे होते.
पुरेशी झोप घ्या
सहसा लोक त्यांच्या कामाच्या व्यापात झोप पूर्ण करू शकत नाहीत. झोपेच्या कमतरतेमुळे अनेकदा डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून, 2022 च्या संकल्पामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की दररोज 8 ते 9 तास झोप घेणे आवश्यक आहे.
हे वाचा - लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Personal life