मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Happy New Year 2021: नवीन वर्षात या Fitness Goals च्या मदतीने राहा तंदुरुस्त

Happy New Year 2021: नवीन वर्षात या Fitness Goals च्या मदतीने राहा तंदुरुस्त

फुप्फुसांची ताकद वाढवणारी 5 योगासने

फुप्फुसांची ताकद वाढवणारी 5 योगासने

अनेकजण नवीन वर्षात जिम लावण्याचा देखील संकल्प करत असतात. परंतु अनेकदा तो केवळ संकल्पच (Resolutiton) राहतो. पण या वर्षी नवीन संकल्प (Resolutiton) सोडून तुम्ही व्यायाम आणि काही गोष्टींच्या मदतीनं तुमचं आरोग्य चांगलं राखू शकता. या नवीन वर्षात Fitness Goal ठरवून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करू शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Karishma
मुंबई, 31 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी (New Year Celebration) संपूर्ण जग सज्ज झालं आहे. या वर्षी कोरोनाच्या (Covid 19) संकटानं सर्व जगाला ग्रासलं होतं. परंतु आगामी नववर्षात काहीतरी चांगलं होण्याची अपेक्षा प्रत्येकाला आहे. या नवीन वर्षात अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा संकल्प (Resolutiton) आपण करत असतो. याचबरोबर अनेकजण नवीन वर्षात जिम लावण्याचा देखील संकल्प करत असतात. परंतु अनेकदा तो केवळ संकल्पच (Resolutiton) राहतो. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे (Health) लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळं वजन वाढून आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. पण या वर्षी नवीन संकल्प (Resolutiton) सोडून तुम्ही व्यायाम आणि काही गोष्टींच्या मदतीनं तुमचं आरोग्य चांगलं राखू शकता. या नवीन वर्षात Fitness Goal ठरवून नवीन वर्षाची चांगली सुरुवात करू शकता. जाणून घ्या काही फिटनेस फंडे - सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक - सकाळी शुद्ध हवेत चालल्याने शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. दररोज सकाळी 15 मिनिटे वॉक (Morning Walk) केल्याने तुम्ही हृदयासंबंधी विकार, डायबिटीज आणि इतर अनेक विकारांपासून सुटका मिळवू शकता. व्यायाम - अनेकदा धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात व्यायाम (Exercise) करण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु शरीराला व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्हाला जिममध्ये किंवा बाहेर जाण्याची गरज नाही. घरामध्ये देखील तुम्ही पुशअप्स, चेस्ट फ्लाय, चेस्ट स्कीवज, बर्पी यांसारखे व्यायाम घरीच करून शरीर तंदुरुस्त ठेवू शकता. त्यामुळे या नवीन वर्षात व्यायाम करण्याचा संकल्प तुम्ही करू शकता. योगासन - योगा (Yoga) करण्यासाठी तुम्हाला कुठंही जाण्याची गरज नाही. घरामध्येच तुम्ही दररोज अर्धा तास योगा करून तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. योगा तुम्हाला ताजतवानं राहण्यास आणि मन शांत ठेवण्यास मदत करतो. जास्तीतजास्त पाणी प्या - शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी झाल्यास आरोग्यावर परिणाम होतात. यामुळे दररोज कमीतकमी 3 लिटर पाणी प्या. यामुळे तुमचं मन आणि शरीर स्वस्थ राहील. कीटो डाएट - अनेकजण वजनवाढीच्या (Weight Gain) समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे या नववर्षात तुम्ही किटो डायट फॉलो करून तुमचं वजन कमी करू शकता. या डायटमुळे तुमच्या शरीरातील फॅट (Fat) कमी होण्यास मदत होते. या डायटमध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) कमी असल्याने वजन कमी करण्यात याचा फायदा होतो. पूर्ण झोप घ्या - शरीराला दररोज 8 तास झोप (Sleep) गरजेची आहे. झोप पूर्ण न झाल्याने शरीर दमल्यासारखं वाटतं. त्यामुळे या नववर्षात 8 ते 9 तास झोप घेण्याचा संकल्प करून त्याचं पालन करा.
First published:

Tags: Health, Lifestyle, Yoga

पुढील बातम्या