होळीच्या 'या' वैज्ञानिक कारणांनी तुम्हीही व्हाल थक्क!

होळीच्या 'या' वैज्ञानिक कारणांनी तुम्हीही व्हाल थक्क!

अर्थात आधुनिकतेमुळे होळीसारखे सण खेळण्याकडे तरूणांचा कल तसा कमी पहायला मिळतो. पण यामागची वैज्ञीनिक कारणं तुम्हाला समजली की तुम्हीही नक्की होळी खेळाल.

  • Share this:

02 मार्च : होळी साजरी करण्यामागे अनेक धार्मिक कारणं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, रंगांची होळी खेळण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणं देखील आहेत. अर्थात आधुनिकतेमुळे होळीसारखे सण खेळण्याकडे तरूणांचा कल तसा कमी पहायला मिळतो. पण यामागची वैज्ञीनिक कारणं तुम्हाला समजली की तुम्हीही नक्की होळी खेळाल.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुलाल किंवा अबीर शरीराच्या त्वचेला उत्तेजित करतं आणि आरोग्याला बळकट करतं. पण त्या रंगांनी माखायचं आणि मग ते रंग निघाले नाही तर या भीतीने आजकल बरेच लोक होळीच खेळत नाहीत. पण याने त्वचेला तेज येणार असेल तर होळीच्या रंगाच नाहून निघायला हरकत नाही.

त्यात होळी हा सण अशा वेळेस येतो जेव्हा ऋतू बदलांमुळे लोकांमध्ये नैराश्य आणि उदासिनता जाणवते. उबदार हवामानामुळे शरीरात काही प्रमाणात थकवा आणि आळसपणा येतो. शरीराचा हाच थकवा आणि आळशीपणा घालवण्यासाठी या हंगामात लोक फक्त गाणचं नव्हे तर बोलतानाही थोडे मोठ्यानेच बोलतात. त्यामुळे कळत-नकळत रोजच्या त्रासातून मनही हलके होते.

या हंगामात ऐकू येणारे संगीतदेखील जोरदारचं असतं. त्यामुळेच शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते.

शुद्ध स्वरुपातील अबीर आणि गुलाल शरीरावर टाकल्याने याचा फार आरामदायी प्रभाव पडतो आणि यामुळे शरीर ताजेतवाणे होते.

सगळ्यांसोबत गाणं गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी खुश होऊन जातं.

त्यामुळे तुम्ही जर होळी खेळत नसाल तर स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी का होईना पण नैसर्गिक रंगांनी नक्की खेळा.

 

First published: March 2, 2018, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading